सांगली : जिल्ह्यातील भाजपा निष्ठावंतांनी ( BJP loyalist from Sangli ) थेट भाजपा विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. वारंवार डावलण्यात येत असल्याने आता थेट प्रदेश कार्यालयासमोर धरणे आंदोलन ( Protest in front of Regional Office ) करत प्रदेशाध्यक्षांना घेराव घालण्याचा निर्णय भाजपाच्या निष्ठावंतांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. इतकेचं नव्हे तर भाजपाच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना झेंडा दाखवण्याचा निर्णय घेत प्रसंगी नव्याने भारतीय जनसंघ स्थापन करण्याचा निर्धार ( Determination to form Bharatiya Jana Sangh ) करण्यात आला आहे. ( Bharatiya Jana Sangh )
पक्षा विरोधात आंदोलनाची भूमिका : सांगलीमध्ये जिल्ह्यातल्या निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांची आज लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात बैठक पार पडली. ज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हे निष्ठावंत कार्यकर्ते बैठका घेऊन आपली भूमिका मांडत असूनही, जिल्हा अथवा प्रदेश कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची विचारपूस केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच याबाबत आता पक्षा विरोधात आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. ज्यातून 200 कार्यकर्त्यांसह मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलनाचा निर्णय घेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालून जोरदार निदर्शने करण्याचा इशाराही या बैठकीदरम्यान देण्यात आला. शिवाय सांगली जिल्ह्यात येणाऱ्या प्रदेशच्या पदाधिकार्यांसह मंत्र्यांनाही काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय ही घेण्यात आला. तसेच एवढे करूनही भाजपा प्रदेश कार्यकारिणीला जाग येत नसेल तर, पुन्हा एकदा भारतीय जनसंघाची स्थापना करावी लागेल,असा सूरही सदर बैठकीत उमटला आहे.