रत्नागिरी - गीतेंविरोधातली ही लढाई नुसती आरोपांची नाही, तर एका बाजूला निष्क्रिय आणि एका बाजूला सक्रिय, अशी ही लढाई आहे. मतांचा मेवा घेऊन जाणारे हवे आहेत की, सेवा देणारे, याचा विचार करा आणि तटकरे साहेबांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही राष्ट्रवादीचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी मतदारांना केले.
रायगड लोकसभा मतदारसंघातील महाआघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ गुहागरमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेसह भाजपवर जोरदार टीका केली. त्याचसोबत अनंत गींतेचाही त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वैचारिकदृष्ट्या खालावलेले असून ते इतरांच्या कुटुंबावर बोलायला लागले असल्याची टीकाही जाधव यांनी केली. अच्छे दिन, काळा पैसा, खात्यामध्ये १५ लाख टाकण्याची आश्वासने म्हणजे फक्त भूलथापा असल्याची टीकाही भास्कर जाधव यांनी यावेळी केली.