ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : 'देशातील कीटकनाशकांवर बंदी आणल्यास द्राक्ष शेती संपुष्टात येईल'

देशातील कीटकनाशकांवर बंदी आल्यास द्राक्ष शेतीला मोठा फटका बसणार आहे. परिणामी द्राक्ष शेती संपुष्टात येईल, अशी भीती द्राक्ष तज्ज्ञ तसेच उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

agriculture in india
देशातील कीटकनाशकांवर बंदी आल्यास द्राक्ष शेतीला मोठा फटका बसणार आहे.
author img

By

Published : Jun 5, 2020, 6:23 PM IST

Updated : Jun 25, 2020, 3:00 PM IST

सांगली - देशातील कीटकनाशकांवर बंदी आल्यास द्राक्ष शेतीला मोठा फटका बसणार आहे. परिणामी द्राक्ष शेती संपुष्टात येईल, अशी भीती द्राक्ष तज्ज्ञ तसेच उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. बंद करण्यात येणाऱ्या २७ पैकी ८० टक्के कीटकनाशकांचा वापर द्राक्षाच्या लागवडीसाठी करण्यात येतो. त्यामुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारकडून देशातील २७ कीटकनाशकांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या निर्णयाला विविध पातळीवर विरोध होत आहे. तसा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधूनही याला आता मोठा विरोध होऊ लागला आहे.

देशातील कीटकनाशकांवर बंदी आल्यास द्राक्ष शेतीला मोठा फटका बसणार आहे.

महाराष्ट्रात साधारण १० लाख हेक्टरवरहून अधिक क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. सांगली आणि नाशिकमध्ये याचे सर्वाधिक प्रमाण आहे. सुरुवातीपासून द्राक्ष शेतीला विविध प्रकारचे रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशी नाशकांचा वापर करावा लागला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत द्राक्षशेतीचे क्षेत्र वाढल्याने अधिकचे उत्पादन काढण्यासाठी रसायनांचा वापर देखील वाढला आहे. तसेच सतत बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. ढगाळ हवामान, गारपीट, अवकाळी पावसाचा फटका बसून द्राक्षबागांवर रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. दावण्या आणि बुरशी यामुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत.

याबाबत द्राक्ष तज्ज्ञ व द्राक्षबाग महासंघाचे माजी अध्यक्ष सुभाष आर्वे यांच्या मते केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विचार होणे गरजेचे आहे. कारण दर ३ वर्षाने द्राक्षशेती मध्ये बदल घडत आहेत. यात बदलत्या हवामानाचा परिणाम आहे. आणि द्राक्ष शेती एकमवे अशी शेती आहे,जी कीटकनाशके, रासायनिक खतांच्या शिवाय करणे अशक्य आहे. मुळात द्राक्ष शेती औषधांच्या माध्यमातून करण्या- शिवाय आता शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. कारण हवामान बदलले की द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव हमखास होतो. त्यामुळे द्राक्षबाग वाचवण्यासाठी कीटकनाशके फवारणी करणे आवश्यक असते. तरच द्राक्षबाग वाचू शकते. दुसऱ्या बाजूला बाजारात द्राक्षांच्या दराचा विचार केल्यास हमीभाव नसल्याने शेतकऱ्याला आर्थिक शाश्वती नाहीय. त्यामुळे मिळेल त्या भावाला शेतकऱ्यांना द्राक्षे विकावी लागतात. साधारणत: द्राक्ष पिकाच्या पान, मणी ,द्राक्ष घड, यांच्यावर कीटक हल्ला करतात. वास्तविक छाटणी नंतर कीटकनाशकांची फवारणी होते. यानंतर मणी घड तयार होताना बुरशी नाशकांची फवारणी होते. एक एकर क्षेत्रात द्राक्ष बाग पीक घेताना सहा महिन्यांच्या कालावधीत बदलत्या हवामानानुसार कीटकनाशके आणि बुरशी नाशकांची फवारणी करण्यात येते. यासाठी जवळपास ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यामध्ये सध्या मिळणारी आणि सर्वाधिक खपली जाणारी कीटकनाशके हे एक किलो व लिटरच्या प्रमाणात २०० पासून ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. द्राक्षबाग शेती करताना शेतकऱ्याला बदलत्या हवामानानुसार तोडणीपर्यंत औषधे वापरावी लागतात. सर्वसाधारण: ही औषधे बाजारात स्वस्त दरात मिळतात. त्यांच्या किंमती या २०० रुपयांपासून ५०० आणि २५०० हजारांपर्यंत आहेत. या औषधांचा वापर सर्रासपणे केला जातो. यामध्ये प्रामुख्याने एम 45 , 22-3, कॅफटॉप, पॉलिराम, ऑक्रोबॅट, कुमाइनएल, अँड्रॉकॉल, कॉनट्फ, टिल्ट अशा कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर होतो. तर सुमारे तीनशेहून वेगवेगळ्या कंपन्यांची औषधे द्राक्ष शेतीत वापरतात.

तर केंद्र सरकारकडून बंदीसाठी प्रस्तावित केलेल्या सुमारे ८० टक्के कीटकनाशके ही द्राक्षबागांमध्ये दैनंदिन वापरण्यात येतात. महत्वाचे म्हणजे ही शेतकऱ्यांना परवडणारी स्वस्तातील औषधे आहेत. त्यामुळे यांना कोणताही पर्याय न देता बंदी आणल्यास द्राक्ष शेती करणे खूप अवघड होईल. कारण बहुराष्ट्रीय कंपन्यांची औषधे महागडी आहेत. ही औषधे वापरुन द्राक्षशेती केल्यास त्याचा खर्च साधारणत: एकरी दीड लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर बाजारात द्राक्षांना मिळणार दर पाहता अधिकचा खर्च परवडणार नाही. तसेच नव्याने येणाऱ्या औषधांचा द्राक्षांवरील परिणाम काय असेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे देशातील कीटकनाशकांवर बंदी आणल्यास द्राक्षाची शेती अवघड होईल आणि परिणामी बागा संपुष्टात येतील, अशी भिती सुभाष आर्वे यांनी व्यक्त केली आहे. तर तासगवाच्या कवठेएकंद मधील प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप तोडकर हे निर्यातीच्या द्राक्षांचे उत्पादन घेतात. त्यांच्या मते युरोपीय देशांमध्ये द्राक्ष निर्यात करताना महत्त्वाचा प्रश्न असतो तो द्राक्षांमध्ये कीटकनाशकांचे कोणताही अंश नसला पाहिजे. अर्थात "रेसिड्यू फ्री"द्राक्षे असली पाहिजेत. काही वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एम -45 सारख्या कीटकनाशक आणि औषधांच्या माध्यमातून त्यावर मात केलेली आहे. औषध फवारल्यानंतर दहा दिवसानंतर द्राक्षांमधील औषधांचा अंश निघून जातो. तसेच स्वस्तातली औषधे असल्याने ती वापरण्यासाठी शेतकऱ्यांना फायद्याची ठरतात.

तर दुसर्‍या बाजूला सध्या भारतीय बाजारपेठेत काही बहुराष्ट्रीय कंपन्यांची महागडी औषधे आहेत. त्यांचा वापर केल्यास द्राक्षांमधील औषधाचा अंश काढणीनंतर देखील कायम राहतो. त्यामुळे ती द्राक्ष 'रेसिड्यू फ्री' लवकर होत नाहीत.परिणामी द्राक्ष निर्यात करता येत नाहीत. त्यामुळे हा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. एका बाजूला औषधांचे दर वाढलेले आहेत. मात्र तरीही कीटकनाशक,बुरशीनाशक अजूनही शेतकऱ्यांच्या आवाक्यात आहेत. आता त्यांच्यावर बंदी आणल्यास शेतकऱ्यांना नाईलाजास्तव बहुराष्ट्रीय कंपन्यांची महागडी कीटकनाशके वापरावी लागतील. मात्र ती परवडणारी नसल्याने परिणामी द्राक्ष शेती संपुष्टात येईल, असे तोडकर म्हणाले.

Last Updated : Jun 25, 2020, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.