सांगली - वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील बाबासाहेब पाटील हे गेल्या चाळीस वर्षांपासून खासगी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहेत. पाटील यांचे वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नामांकित डॉक्टर म्हणून काम करत होते. त्यांचाच वारसा गेली चाळीस वर्षापासून पाटील पुढे चालवत आहेत.
सध्या कोरोनाचे संकट वाढतच असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहे. तर पोलीस, शासकीय डॉक्टर, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका अहोरात्र झटत आहेत. बाळासाहेब पाटील हे समाजासाठी चांगले करण्याच्या उद्देशाने त्यांचे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे असल्याने. डॉ. बाबासाहेब पाटील यांनी आपला 69वा वाढदिवस साधेपणाने करून त्या पैशातून अर्सेनिक अल्बम 30 या औषधांचे वाटप केले आहे. त्यांनी एक हजार लोकांना घरोघरी जाऊन हे औषध दिले आहे.
या अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांमुळे रोग प्रतिकार शक्ती दुप्पट प्रमाणात वाढत असल्याचे. डॉ बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी घरोघरी फिरून मोफत औषध वाटप केले होते. त्यांनी कुरळप पोलिसांनादेखील या गोळ्यांचे वाटप केले.