सांगली : सेक्सेल सिमेन या प्रयोगशाळेमधील जेनेटिक सायन्समुळे दुग्ध क्षेत्रात क्रांती होईल,असे मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. तसेच सरकारवर अवलंबून राहू नका अन्यथा चालती गाडी पंक्चर होते, असा सल्ला देखील गडकरी यांनी दिला आहे. ते सांगलीच्या भिलवडी येथील चितळे डिअरमध्ये आयोजित समारंभात बोलत होते.
सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन : पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथील चितळे उद्योग समूहाच्यावतीने वतीने आशिया खंडातील सर्वात मोठे सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दूध क्षेत्रात क्रांती : यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, चितळे उद्योग समूहाकडून सेक्सेल सीमेन जेनेटिक प्रयोगशाळे निर्माण करण्यात आली आहे. ज्यामुळे दूध क्षेत्रात पुढील 100 वर्षात मोठी क्रांती होणार असून सामाजिक, अर्थीक मोठा परिणाम होईल. यात दूध उत्पादनात वाढ होण्या बरोबरच सशक्त गाई तसेच बैलची उत्पत्ती करता येणार आहे,
ऍग्रो प्रोसिसिंगला प्रोत्साहन : आज खेड्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. गावांमध्ये रोजगार नसल्याने नागरिक शहराकडे धाव घेता आहेत. त्यामुळे शहराच्या प्रशासनावर अधिक भार पडत असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. गावात उद्योग नाही, व्यापार नाही, चांगल्या शाळा महाविद्यालने नाहीत. त्यामुळे कृषी क्षेत्रावर परिणाम होत असुन शेती क्षेत्राचा विकास खुंटला आहे. कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल, तर यामध्ये उत्पादकता वाढवली पाहिजे असे गडकरी म्हणाले. ऍग्रो प्रोसिसिंग इंडस्ट्रीज आणि आलाय इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.
दुध उत्पादनात वाढ : विशेषत: अनोख्या तंत्रज्ञानाने दुग्धोत्पादन वाढवण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत. आयव्हीएफ तंत्रज्ञान खुप महत्वाचे आहे. ते अनुवांशिक विज्ञान आहे, त्यामुळे दूध उत्पादन अनेक पटींनी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचा फायदा आपल्या देशातील गीर आणि सायबा गाईंच्या प्रजातींना सुद्धा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. होणार आहे. पुढच्या 100 वर्षात काय बदल होतील, भविष्यात आपल्याकडे असलेली म्हैस सरासरी 25 लिटर दुध होईल त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन दुध उत्पादनात वाढ होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
धोरणे बदलण्याची : यावेळी शरद पवार म्हणाले, 2014 मध्ये कृषी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देशात इतर धान्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे भारत गव्हात जागतिक क्रमवारीत 2 नंबर तसेच तांदळात आणी फळात 1 नंबर होता. पण खाद्यतेलाच्या बाबतीत तसे होऊ शकले नाही. जीएम बियाण्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे तसे होऊ शकले नाही. जगात सर्वाधिक दुग्धजन्य प्राणी भारतात आहेत, परंतु भारतात सर्वात कमी उत्पादन होते. त्यामुळे दूध आणि गायींचा दर्जा वाढला पाहिजे. काही धोरणे बदलण्याची गरज आहे, भारत अन्न क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे. शरद पवार यांनीही खाद्यतेलाबाबतची परिस्थिती समाधानकारक नसल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव नाईक, आमदार सुमनताई पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - Devendra Fadnavis on S Jaishankar : देवेंद्र फडणवीसांनी केले परराष्ट्रमंत्र्यांचे कौतुक; म्हणाले...