सांगली - दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या केरेवाडी या ठिकाणी आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीला अपघात झाला ( Warkari Accident At Miraj Pandharpur Road ) होता. भरधाव गाडी दिंडीत घुसल्याने 17 वारकरी हे गंभीर जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस ( Cm Eknath Shinde Help Warkari Accident ) केली.
भरघाव जीप वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने 17 जण जखमी झाले होते. त्यांच्यावर मिरजमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या जखमी वारकऱ्यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी आज ( 7 जुलै ) विचारपूस केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांनी जखमी वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वारकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करत कोणत्याही प्रकारचे काळजी करू नये, असा धीर मुख्यमंत्र्यांनी दिला.
जखमी वारकऱ्यांना मदत - वारकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. वारकऱ्यांच्या उपचारामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी बाळगू नये. तसेच, तसेच, जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांच्यावतीने देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार अनिल बाबर यांनी केली आहे.
हेही वाचा - Kiriti Somaiya : शिंदे गटातील भ्रष्टाचारी नेत्यांची नावे घेताच सोमैयांची चुप्पी; राऊत, परबांना इशारा