ETV Bharat / state

​​​​​​​दुष्काळाची दाहकता वाढली; चाऱ्याचे दर भडकल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ - sangli drought

जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या उद्भवली आहे.

दुष्काळ
author img

By

Published : Mar 12, 2019, 3:38 PM IST

सांगली - जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या उद्भवली आहे. जनावरांच्या चाऱ्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे चाऱ्याचे दर ३ हजार रुपये शेकडा पासून ४ हजारांच्या घरात पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱयांचे कंबरडे मोडले असून तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

दुष्काळ

जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर आणि तासगाव या तालुक्यांसह इतर गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. जिल्ह्यात अद्याप एकही चारा छावणी सुरू झालेली नाही. अशा परिस्थित जनावरांना जगवायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील महिन्यात ज्वारीचा कडबा ३ हजार रुपये शेकडा दराने मिळत होता, आता त्याचे दर आता ४ हजारांवर गेले आहे.

दुष्काळी पट्ट्यात उसाचे वाढे हाच आता जनावरांचा चारा झाला आहे. परंतु, जिल्ह्यातील ३ साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. त्यामुळे शेजारील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरातून दिवसाला ५ ते ६ गाड्या वाढे जिल्ह्यात विक्रीसाठी येते. हा चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडते. परंतु, या चाऱ्यासाठी जादा किंमत मोजावी लागत आहे. शासनाकडून तत्काळ उपाययोजना अपेक्षित होत्या. मात्र, अद्यापही शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

जत तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल आहेत. मात्र, प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही. आता प्रशासन निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहे. त्यामुळे चारा छावण्या कधी सुरू होतील हे सांगता येत नाही. एकीकडे दुष्काळामुळे शेतमजुराच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही. आता मार्च महिना सुरू असून कडक उन्हाळ्याचे पुढील ३ महिने कसे काढायचे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AV

Feed send - file name - R_MH_1_SNG_12_MARCH_2019_CHARA_DAR_SARFARAJ_SANADI

स्लग - दुष्काळाची दाहकात वाढली, चाऱ्याचे दर भडकल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट..

अँकर - जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता वाढत आहे.तसतसे अनेक प्रश्न भेडसावत आहेत.जनावरांच्या चाऱ्याची समस्या असताना आता यात भर पडली आहे.ती भडकेलेल्या चाऱ्याचा दरची,३ हजार रुपये शेकडा,असणारा दर ४ हजारांच्या घरात पोहचला असून दुष्काळग्रस्त शेतकरयांचे कंबरडे मोडले असून तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. Body: व्ही वो - सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील जत,कवठेमहांकाळ, तासगाव,खानापूर आणि आटपाडी तालुक्यांत दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे.पाण्या बरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.तर सांगली जिल्ह्यात अद्याप एकही चारा छावणी सुरू झालेली नाही.अश्या स्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे.गेल्या
महिन्यात ज्वारीचा कडबा ३ हजार रुपये शेकडा मिळायचा, हाच दर आता ४ हजारावर गेला आहे.त्यामुळे दुष्काळाच्या वणव्यात कुटुंब जगवायचं का जनावर,या विवंचनेत शेतकरी आहेत.

तर दुष्काळी पट्ट्यात उसाचा वाडा हा जनावरांचा चारा झाला आहे.परंतु जिल्ह्यातील तीन साखर कारखान्याचे गाळप बंद झाले आहे.त्यामुळे शेजारील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरातून दिवसाला पाच ते सहा गाड्या जिल्ह्यात विक्री साठी येतात.आणि हा चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडते.परंतु या चाऱ्यासाठी जादा किंमत मोजावी लागते आहे.चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली असली,तरी शासनस्तरावर ढिम्म कारभार सुरू आहे.
जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर आणि तासगाव या तालुक्यांसह इतर गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.शासनाकडून तत्काळ उपाययोजना अपेक्षित होत्या. मात्र अद्यापही शासनाकडून ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

जत तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल आहेत.मात्र प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही.आणि आता प्रशासन निवडणुकीच्या कामकाजात गुंतले आहे.त्यामुळे चारा छावण्या कितपत सुरू होतील हा प्रश्नच आहे.

एकीकडे दुष्काळामुळे शेतमजुराच्या हाताला काम नाही.शेतकऱ्यांचे उत्पन्नही नाही.तर सध्या मार्च महिना सुरू असून, अजून कडक उन्हाळ्याचे तीन महिने आहेत.ते कसे काढायचे आणि
जनावरांना कसे जगवायचे हा मोठा प्रश्‍न
शेतकऱ्यांसमोर आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.