ETV Bharat / state

लोकांच्या श्रमदानातून महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त व पाणीदार बनणार - आमिर खान

महाराष्ट्राला पाणीदार बनवण्यासाठी आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनकडून राज्यात १ मेपासून पुन्हा श्रमदान मोहीम सुरू झाली आहे. तुफान आलंय, म्हणत गावच्या गाव दुष्काळ मिटवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. सांगली जिल्ह्यातही पाणी फाउंडेशनची श्रमदान मोहीम धडक्यात सुरू झाली. या श्रमदानाला बळ देण्यासाठी खुद्द आमिर खान पोहोचला.

author img

By

Published : May 2, 2019, 9:31 PM IST

सावर्डे येथील पाणी फाउंडेशनच्या श्रमदान मोहिमेत आमिर खान सहभागी

सांगली - लोकांच्या श्रमदानातून महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त व पाणीदार बनणार आहे, असा विश्वास अभिनेता आमिर खान याने व्यक्त केला आहे. तसेच माणूस कमजोर असेल. पण त्याच्याकडे जर आशा आणि भक्कम आत्मविश्वास असेल तर हाच कमजोर माणूस हिमालय पार करू शकेल, असे मतही त्याने यावेळी व्यक्त केले. सांगलीतील सावर्डे येथील पाणी फाउंडेशनच्या श्रमदान मोहिमेत आमिर सहभागी झाला होता.

सावर्डे येथील पाणी फाउंडेशनच्या श्रमदान मोहिमेत आमिर खान सहभागी

महाराष्ट्राला पाणीदार बनवण्यासाठी आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनकडून राज्यात १ मेपासून पुन्हा श्रमदान मोहीम सुरू झाली आहे. तुफान आलंय, म्हणत गावच्या गाव दुष्काळ मिटवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. सांगली जिल्ह्यातही पाणी फाउंडेशनची श्रमदान मोहीम धडक्यात सुरू झाली. या श्रमदानाला बळ देण्यासाठी खुद्द आमिर खान पोहोचला.

सांगलीतील तासगाव तालुक्यातील सावर्डे गावात सुरू असलेल्या श्रमदान मोहिमेला आमिर खानने बुधवारी हजेरी लावली. अचानक गावात आमिर खान येणार या बातमीमुळे अख्खा गाव त्याला पाहण्यासाठी गावाच्या बाहेर जमले होते. यावेळी पत्नी किरण रावसह आमिर खानने थेट श्रमदान मोहिमेच्या ठिकाणी हजेरी लावत श्रमदान केले. त्यानंतर गावात आयोजित छोटेखानी समारंभालाही त्याने हजेरी लावली.

यावेळी बोलताना आमिर म्हणाला, प्रत्येक गाव एक झाल्यास सर्वच समस्या सुटतील. ५ वर्षांपूर्वी पाणी फाऊंडेशनच्या या स्पर्धेची सुरुवात करताना भीती वाटत होती. लोक येतील का ? काम करतील का ? यासह अनेक प्रश्न सतावत होते. पण ज्या वेळू गावात एका वर्षांपूर्वी ७५ वेळा हातपंप मारल्यावर पाणी येत होते, तेच पाणी आता एका हातपंपामध्ये येत आहे. हा चमत्कार आहे. त्यावेळी जर एका वेळी पंप मारल्यावर पाणी नाही आले तर मी अभिनय सोडेन, असे आव्हान दिले होते. मात्र, लोकांच्या कष्टाच्या व गावाच्या एकीच्या बळावर हे सर्व शक्य झाले आहे. तुम्ही जे काम करत आहात ते महाराष्ट्र बघेल व त्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास आमिरने यावेळी व्यक्त केला.

आपल्या ताकदीने गाव पाणीदार होत आहेत. त्याचा आनंद सांगू शकत नाही व त्याची किंमत होऊ शकत नाही. आमच्या अडचणींवर आपणच मार्ग शोधून उपाय करू शकतो. जनता व प्रशासन एकत्र आल्यास अशक्य काहीच नाही. माणूस कमजोर असेल. पण त्याच्याकडे जर आशा आणि भक्कम आत्मविश्वास असेल तर हाच कमजोर माणूस हिमालय पार करू शकेल. त्याचबरोबर लोकांच्या श्रमदानातून महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त व पाणीदार बनणार आहे, असा विश्वासही आमिरने यावेळी व्यक्त केला आहे.

येथे येऊन मला खूप फरक पडला आहे. लोक स्वत: काम करून आपल्या समस्या सोडवत असतील तर ते असाधारण आहे. आपण आपल्या हाताने देशाची परिस्थिती बदलू शकतो. मात्र, त्यातही गावे व शहरांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व गाव आपले मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लवकरच पाणीदार होणार, असा विश्वास यावेळी बोलताना आमिर खानची पत्नी किरण राव हिने व्यक्त केला.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVBB

Feed send file name - R_MH_1_SNG_02_MAY_2019_AMIR_KHAN_IN_SHRAMDAN_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_5_SNG_02_MAY_2019_AMIR_KHAN_IN_SHRAMDAN_SARFARAJ_SANADI

स्लग - लोकांच्या श्रमदानातून महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त व पाणीदार बनणार - अभिनेता आमिर खान.

अँकर - लोकांच्या श्रमदानातून महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त व पाणीदार बनणार आहे.असा विश्वास अभिनेता अमीर खान याने व्यक्त केला आहे.तसेच माणूस कमजोर असेल पण त्याच्याकडे जर आशा आणि भक्कम आत्मविश्वास असेल तर हाच कमजोर माणूस हिमालय पार करू शकेल असे मतही अभिनेता अमीर खान यांनी व्यक्त केले आहे.सांगलीतील सावर्डे येथील पाणी फाउंडेशनच्या श्रमदान मोहीमत अमीर खान सहभाग झाला होता.Body:
व्ही वो - महाराष्ट्राला पाणीदार बनवण्यासाठी अभिनेता अमीर खान याच्या पाणी फाउंडेशनकडून राज्यात १ मे पासून पुन्हा श्रमदान मोहीम सुरू झाली आहे.तुफान आलंय म्हणत गावच्या गाव दुष्काळ मिटवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत.सांगली जिल्ह्यातही पाणी फाउंडेशनची श्रमदान मोहीम धडक्यात सुरू झाली आहे.आणि या श्रमदानाला बळ देण्यासाठी खुद्द अमीर खान पोहचत आहे.आणि सांगलीतील तासगाव तालुक्यातील सावर्डे गावात सुरू असलेल्या श्रमदान मोहीमेला अमीर खान याने बुधवारी हजेरी लावली.अचानक गावात आमीर खान येणार या बातमीमुळे अक्खा गाव अमीर खान याला पाहण्यासाठी गावाच्या बाहेर जमले होते.आणि पत्नी किरण राव सह अमीर खान याने थेट श्रमदान मोहिमेच्या ठिकाणी हजेरी लावत श्रमदान केले.यानंतर गावात आयोजित छोटे खानी समारंभालाही अमीर खान याने हजेरी लावली .यावेळी बोलताना प्रत्येक गाव एक झाल्यास सर्वच समस्या सुटतील असे मत व्यक्त करत ५ वर्षांपूर्वी पाणी फौंडेशनच्या या स्पर्धेची सुरवात करताना भीती वाटत होती.लोक येतील का ? काम करतील का यासह अनेक प्रश्न सतावत होते. पण ज्या वेळू गावात एका वर्षांपूर्वी ७५ वेळा हातपंप मारल्यावर पाणी येत होतं तेच पाणी आता एका हातपंपामध्ये येत.हा चमत्कार आहे.यावेळी जर एका वेळी पंप मारल्यावर पाणी नाही आलं तर मी अभिनय सोडेन असे आव्हान दिले होते. मात्र लोकांच्या कष्टाच्या व गावच्या एकीच्या बळावर हे सर्व शक्य झाले आहे. तुम्ही जे काम करताय ते महाराष्ट्र बघेल व त्यांना प्रेरणा मिळेल.असा विश्वास व्यक्त करत आपल्या ताकतीने गावं पाणीदार होत आहेत.त्याचा आनंद सांगू शकत नाही व त्याची किंमत होऊ शकत नाही.आमच्या अडचणींवर आपणच मार्ग शोधून उपाय करू शकतो.प्रशासनालाही त्यांनी यावेळी धन्यवाद दिले.जनता व प्रशासन एकत्र आल्यास अशक्य काहीच नसल्याचे स्पष्ट करत माणूस कमजोर असेल पण त्याच्याकडे जर आशा आणि भक्कम आत्मविश्वास असेल तर हाच कमजोर माणूस हिमालय पार करू शकेल असे मत व्यक्त केले.त्याच बरोबर लोकांच्या श्रमदानातून महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त व पाणीदार बनणार आहे.असा विश्वासही अमीर खान याने व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना अमीर खानची पत्नी किरण राव हिने इथे येऊन मला खूप फरक पडला आहे.लोक स्वता काम करून आपल्या समस्या सोडवत असतील तर ते असाधारण आहे.आणि आपल्या हाताने देशाची परिस्थिती बदलू शकतो.मात्र त्यातही गावे व शहरांनी एकत्र येण्याची गरज आहे.सर्व गाव आपले आपले मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आलाय त्यामुळे महाराष्ट्र लवकरच पाणीदार होणार असा विश्वास व्यक्त केला.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.