ETV Bharat / state

जलमय झालेला कृष्णा काठ व अन्न गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांचे विदारक हवाई दृश्य

सांगलीत कृष्णा नदीला महापूर आलेला आहे.  चार दिवसांपासून जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या पुराचा शेकडो गावांमध्ये वेढा बसला आहे. भुकेने व्याकूळ झालेले पूरग्रस्त अन्न घेण्यासाठी तुटून पडत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.

जलमय झालेला कृष्णा काठ व अन्न गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांचे विदारक हवाई दृश्य
author img

By

Published : Aug 10, 2019, 9:13 AM IST

Updated : Aug 10, 2019, 10:05 AM IST

सांगली- जिल्ह्यातील महापुरात अडकलेल्या पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून फुड पॅकेट्स वाटप करण्यात आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून जलमय झालेला कृष्णाकाठ आणि खाली फेकण्यात येणारे फूड पॅकेट गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांची झुंबड, हे दृश्य या महापुराची दाहकता दाखवणारी आहेत.

जलमय झालेला कृष्णा काठ व अन्न गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांचे विदारक हवाई दृश्य

सांगलीत कृष्णा नदीला महापूर आलेला आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीला आलेल्या पुराचा शेकडो गावांमध्ये वेढा बसला आहे. सांगली शहराला याचा खूप मोठा फटका बसला आहे. निमगाव आणि सांगली पाण्याखाली आहे. मागील चार दिवसांपासून अनेक गावांमध्ये हजारो नागरिक अडकून पडलेले आहेत. नागरिकांना रेस्क्यू करून आता आर्मी आणि एनडीआरएफचे पथक बाहेर काढत आहेत. मात्र, बोटींच्या अपुरी संख्येमुळे पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचणे अशक्य बनले आहे.

राज्य सरकारने अखेर या ठिकाणी नेव्हीचे हेलिकॉप्टर पाठवून दिले होते. शुक्रवारी सकाळपासून सांगली शहरासह, मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे फुड पॅकेट्स पोहोचवण्यात आले. हवेतून खाली छतावर असलेल्या नागरिकांकडेही फूड पॅकेट टाकण्यात आले. भुकेने व्याकूळ झालेले पूरग्रस्त अन्न घेण्यासाठी तुटून पडत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. त्याचबरोबर अवकाशातून कृष्णाकाठची घेण्यात आलेली दृश्य व फुड पॅकेट्स गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांची उडालेली झुंबड पाहिल्यानंतर या महापुराची दाहकता लक्षात येईल.

Feed send whatsapp - 

स्लग - जलमय झालेला कृष्णाकाठ व अन्न गोळा करणारे पूरग्रस्तांचे विदारक हवाई दृश्य..

अंकर - सांगली जिल्ह्यातल्या महापुरात  अडकलेल्या पूरग्रस्तांना हेलिकॉप्टर मधून  अन्न आणि पाणी पोहोचवण्याचं काम सुरू आहे, पुरात अडकलेल्या नागरिकांना फुड पॅकेट्स वाटप करण्यात येत आहेत. हेलिकॉप्टर मधून जलमय झालेला कृष्णाकाठ आणि खाली फेकण्यात येणारे फूड पॅकेट गोळा करणारे पूरग्रस्तांची झुंबड,हे या महापुराचे विदारक दृश्य दाखवणारी आहेत..

सांगली चव्हाण आणि कृष्णा नद्यांना महापूर आलेला आहे चार दिवसांपासून जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णात आजच्या शेकडो गावांमध्ये पुराचा वेढा बसला आहे सांगली शहराला तरी याचा खूप मोठा फटका बसला आहे. निमगाव अधिक सांगली पाण्याखाली आहे. अडीच चार दिवसांपासून अनेक गावांमध्ये हजारो नागरिक अडकून पडलेल्या आहेत नागरिकांना रेस्क्यू करून आता आर्मी आणि NDRF चे बाहेर काढत आहेत ,मात्र बोटींची असणारी संख्या आणि पुरात अडकलेल्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचणे अशक्य बनलय,त्यामुळे राज्य सरकारने अखेर या ठिकाणी नेव्हीची हेलिकॉप्टर पाठवून दिले आहेत. आणि आज सकाळपासून सांगली शहरासह, मिरज,पलूस ,वाळवा आणि शिराळा तालुक्यातील पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर त्याद्वारे फुड पॅकेट्स पोहोचवण्यात येत आहेत हवेतून खाली छतावर असलेल्या नागरिकांकडे ही फूड पॅकेट टाकण्यात येत आहेत, आणि भुकेने व्याकूळ झालेले पूरग्रस्त एखाद्या जनावरांच्या प्रमाणे हे अन्न घेण्यासाठी तुटून पडत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्याचबरोबर  अवकाशातून कृष्णाकाठचे घेण्यात आलेली दृश्य व  फुड पॅकेट्स गोळा करणाऱ्या पूरग्रस्तांची उडालेली झुंबड , पाहिल्यानंतर या महापुराच्या भीषण  दाहकता दाखवून देण्यासाठी पुरसे आहेत असेच म्हणावे लागेल..

Last Updated : Aug 10, 2019, 10:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.