ETV Bharat / state

Young girl election : परदेशातील उच्च शिक्षण सोडून तरुणी उतरली सरपंच पदाच्या निवडणुकीत - उच्चशिक्षित तरुणी

उच्चशिक्षित तरुणी गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी थेट परदेशातून आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून परतली आहे. गावच्या विकासासाठी परदेशातील उच्च शिक्षण सोडून ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखड्यात ( arena of Gram Panchayat elections ) उतरली आहे.

Young girl election
परदेशातील उच्च शिक्षण सोडून तरुणी उतरली सरपंच पदाच्या निवडणुकीत
author img

By

Published : Dec 14, 2022, 11:00 AM IST

परदेशातील उच्च शिक्षण सोडून तरुणी उतरली सरपंच पदाच्या निवडणुकीत

सांगली : गावच्या विकासासाठी परदेशातील उच्च शिक्षण सोडून एक तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखड्यात (arena of Gram Panchayat elections ) उतरली आहे. यशोधरा राजे शिंदे, असे या अवघ्या 21 वर्षीय तरुणीचे नाव असून सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी येथे सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सध्या ती आपले नशीब आजमावत आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी याठिकाणी सरपंच पदाचे निवडणूक लढवणारे यशोधरा राजे शिंदे ही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 21 वय असणारी यशोधरा ही एक उच्चशिक्षित तरुणी असून गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उतरण्यासाठी ति थेट परदेशातून आपल्या शिक्षण अर्ध्यावर सोडून परतली आहे.

गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरली : यशोधरा राजे शिंदे ही जॉर्जिया या ठिकाणी न्यू विजन युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएस चौथ्या वर्षाचे शिक्षण सुरू आहे. मात्र यशोधरा ही शिक्षण सोडून थेट गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या निमित्ताने सरपंच पदासाठी यशोधरा राजे हिने उमेदवारी दाखल करत प्रचार सुरू केला आहे. याबाबत यशोधरा राजे शिंदे म्हणाली, मी माझे जॉर्जिया येथील शिक्षण सोडून वड्डी गावच्या विकासासाठी परतली आहे. गावाचा सर्वांगीण विकास त्याबरोबर महिलांचे प्रश्न अश्या अनेक गोष्टी सोडवण्याच्या दृष्टीने आपण या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलो आहोत. आपले पणजोबा आणि आजी वड्डी नजीकच्या नरवाड गावचे सरपंच राहिले आहे. त्यांनी गावच्या विकासासाठी मोठे काम केले आणि तोच वारसा घेऊन निवडीच्या गावचा विकास करण्यासाठी या निवडणुकीत उभी राहिली आहे आणि मला खात्री आहे की, वड्डीचे ग्रामस्थ माझ्यावर विश्वास ठेवतील आणि मी विजयी होणार असे मत यशोधरा राजे शिंदे हिने व्यक्त केले आहे. गाव खेड्यातील आजची तरुण पिढी नोकरी शिक्षण व्यवसायाच्या निमित्ताने पुढे शहरात आणि परदेशात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत असताना विदेशातील उच्च शिक्षण सोडून गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन परतलेली यशोधरा राजे ही नव्या पिढीला राजकारणात येण्यासाठी आदर्श ठरत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.