ETV Bharat / state

सांगलीकरांचे प्रेम विसरू शकणार नाही - अतिरिक्त पोलीस अधीक्षक बोराटे - सांगली जिल्हा

सांगलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची पुणे, खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. यावेळी कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत, सांगलीकरांचे प्रेम विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया बोराटे यांनी दिली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटेंची बदली
author img

By

Published : Jul 19, 2019, 4:13 PM IST

सांगली - महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारांच्या बदलीचे आदेश गृहमंत्रालयाने नुकतेच दिले आहेत. यामध्ये सांगलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची पुणे, खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. सांगली पोलीस दलाकडून त्यांना निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत सांगलीकरांचे प्रेम विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया बोराटे यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी बोराटे हे सांगलीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. शांत आणि संयमी स्वभाव असणाऱ्या बोराटे यांनी दोन वर्षात जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाची कामगिरी बजावली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटेंची बदली

भीमा-कोरेगाव दंगलीचे सांगलीत उमटलेले पडसाद आपल्या कर्तबगारीने नियंत्रणात आणत शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले. तसेच शेतकरी संघटनांची ऊस आंदोलने, मराठा क्रांती मोर्चा अश्या अनेक घटना त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या. त्यामुळे सांगली जिल्ह्यात बोराटे यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने अखेर बोराटे यांची गृह विभागाकडून बदली करण्यात आली आहे.

बदलीनंतर सांगली पोलीस दल व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून बोराटे यांना जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. दोन वर्षांमध्ये सांगली जिल्ह्यात काम करताना अनेक स्तरातून प्रेम मिळालं त्यामुळे आपण यशस्वी कामगिरी करू शकलो. सांगली जिल्ह्यातली दोन वर्षांची कारकीर्द आजवरच्या सेवेतील स्मरणात राहणारी आहे, असं ते म्हणाले. बोराटेंच्या जागी खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख मनीषा डुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

Avb

Feed send file name - mh_sng_01_additional_sp_transfer_vis_1_7203751 - mh_sng_01_additional_sp_transfer_byt_2_7203751.

स्लग - सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची बदली,सांगलीकर जनतेचे प्रेम विसरू शकणार नाही -शशिकांत बोराटे.

अँकर - सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची बदली झाली आहे. पुणे ,खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख पदी त्यांची नियुक्ती झाली.सांगली पोलीस दलाकडून त्यांना निरोप देण्यात आला आहे.अनेक मान्यवरांच्याकडूनही बोराटे यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात कामांच्या आठवणींना उजाळा देत,सांगलीकर जनतेचे प्रेम विसरू शकणार नाही.अशी प्रतिक्रिया बोराटे यांनी दिली आहे.Body:व्ही वो - सांगली जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदली झाली आहे.दोन वर्षांपूर्वी बोराटे हे सांगली पोलीस अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते.शांत आणि संयमी स्वभाव असणाऱ्या बोराटे यांनी दोन वर्षात जिल्ह्यात अनेक कारवाया करत गुन्हेगारी रोखण्यासाठी व विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाची कामगिरी बजावली. भीमकोरेगाव दंगलीची सांगलीत उमटलेले पडसाद,आपल्या कर्तबगारीने नियंत्रणात आणत जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याचे कामगिरी बोराटे यांनी प्रत्यक्षात बजावली होती.तसेच शेतकरी संघटनांचे उसाची आंदोलने,मराठा क्रांती मोर्चा अश्या अनेक घटना त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या. त्यामुळे सांगली जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने अखेर बोराटे यांची गृह विभागाकडून बदली करण्यात आली आहे.त्यांच्या बदलीनंतर सांगली पोलीस दल व सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांच्या कडून बोराटे यांना जड अंतकरणाने निरोप व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.तर या बदली नंतर बोराटे यांनाही गहिवरून आले आहे, दोन वर्षांमध्ये सांगली जिल्ह्यात काम करताना अनेक करातून पाठबळ प्रेम मिळालं त्यामुळे यशस्वी कामगिरी आपण करू शकलो ,त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला दोन वर्षातली कारकिर्दी आता पर्यंतच्या सेवेतील विस्मरणात राहणारी राहिली आहे.आणि सांगलीकरांचा हे प्रेम आपण कदापिही विसरू शकणार नाही,अशी प्रतिक्रिया शशिकांत बोराटे यांनी यावेळी दिली आहे.
बोराटे यांच्या जागी खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख मनीषा डुबल यांची नियुक्ती झाली आहे.

बाईट - शशिकांत बोराटे - पोलीस अधिकारी .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.