सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंतराव पाटील आज महाविकास आघाडीत मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याचा जल्लोष जयंत पाटील यांच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. जयंत पाटील यांची पक्षाने उपमुख्यमंत्री म्हणून निवड करावी अशा भावना समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत.
सांगलीच्या इस्लामपूर येथील राजरामबापू पाटील साखर कारखान्याच्या परिसरात आसणाऱ्या राजारामबापू यांच्या पुतळ्याला अभिवादन करत राष्ट्रवादी व पाटील समर्थकांनी जयंत पाटील व शरद पवारांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी मंत्री पदाचा आनंदोत्सव साजरा करत शरद पवार आणि पक्षा सोबत जयंत पाटील यांची असणारी एकनिष्ठा आणि मंत्रिमंडळाचा प्रदीर्घ अनुभव पाहता उपमुख्यमंत्री पदाचे राष्ट्रवादी पक्षातून एकमेव दावेदार असल्याने त्यांची निवड करण्यात यावी अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.