ETV Bharat / state

गुजरातमधून सांगलीत आलेल्या महिलेला कोरोनाची लागण, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा नऊवर - corona news etv bharat

खानापूर तालुक्यातील साळशिंगी येथे एक कुटुंब गुजरातहून आले होते. त्यांची तपासणी विटा ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आली. यामधील पती-पत्नी असणाऱ्या दोघांमध्ये कोरोना लक्षणे आढळल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात पाठवण्यात आले होते. रविवारी त्यांचे रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाले असून यातील ३० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

corona positive case in sangli
सांगलीतील महिलेला कोरोनाची लागण
author img

By

Published : May 11, 2020, 7:55 AM IST

सांगली - गुजरातच्या अहमदाबादवरून सांगली जिल्ह्यात आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावामधील आहे. त्यामुळे, सांगली जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी याबद्दलची माहिती दिली.

खानापूर तालुक्यातील साळशिंगी येथे एक कुटुंब गुजरातहून आले होते. त्यांची तपासणी विटा ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आली. यामधील पती-पत्नी असणाऱ्या दोघांमध्ये कोरोना लक्षणे आढळल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात पाठवण्यात आले होते. याठिकाणी त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. रविवारी त्यांचे रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाले असून यातील ३० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महिलेच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी एक पथक विटा आणि साळशिंगकडे रवाना झाले आहे. तसेच प्रशासनातर्फे तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.