ETV Bharat / state

वीज कोसळून मेंढपाळासह 10 मेंढ्या जागीच ठार, तर 4 जण जखमी - वीज कोसळून मेंढ्या ठार

कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे याठिकाणी असणाऱ्या नरळे वस्तीवर अंगावर वीज पडून एक मेंढपाळसह 10 दहा मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

10 मेंढ्या जागीच ठार
10 मेंढ्या जागीच ठार
author img

By

Published : Apr 15, 2022, 10:24 AM IST

सांगली - वीज पडून एका मेंढपाळासह 10 मेंढ्या ठार तर चार मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नांगोळे येथे ही घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पाऊस दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.

वीज पडून मेंढपाळ आणि मेंढ्या ठार - कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे याठिकाणी असणाऱ्या नरळे वस्तीवर अंगावर वीज पडून एक मेंढपाळसह 10 दहा मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत रामचंद्र पांडुरंग गडदे (वय 45 राहणार, नांगोळे) या मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे. गडदे हे दुपारच्या सुमारास आपली मेंढरे चारण्यासाठी गावाबाहेर असणाऱ्या नरळे वस्ती याठिकाणी गेले होते. दरम्यान सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.

घरी परतत असताना घडली दुर्दैवी घटना - गडदे व त्याठिकाणी असणारे इतर मेंढपाळ आपल्या मेंढ्यांसह घरी परतत असताना अचानकपणे आकाशातुन गडदे सह इतर मेंढपाळांच्या कळपावर वीज कोसळली. ज्यामध्ये रामचंद्र गडदे आणि मेंढरांच्या अंगावर वीज पडली. यात रामचंद्र गडदे यांच्यासह 10 मेंढ्या जागीच ठार झाल्या. त्याचबरोबर या घटनेत भगवान किसन नाईक, गणेश नामदेव गडदे, आप्पासो पांडुरंग यमगर आणि गणपती महादेव गडदे 51 हे जखमी झाले. या घटनेमुळे नांगोळे गावावर शोककळा पसरली असून या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.