सांगली : महापुर ओसरत असताना सांगलीत आता मगरी आढळत असल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी मगरी दिसत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सांगलीवाडी येथे एका महाकाय मगरीला पकडण्यात आले आहे. नदीकाठच्या दफनभूमी शेजारी 12 फूट लांबीची मगर आढळून आली. यानंतर नागरिकांनी आणि प्राणी मित्रांनी या मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. यावेळी या अजस्त्र मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महापुरानंतर मगरींचा धोकाः सांगलीवाडीत पकडली 12 फुटी अजस्त्र मगर कृष्णेतील महाकाय मगर जेरबंदसांगलीच्या कृष्णाकाठचा महापूर ओसरू लागल्यानंतर आता पात्रातल्या मगरींचा वावर ठिक-ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशीच एक महाकाय मगर सांगलीवाडीजवळ कृष्णाकाठी आढळून आली. नदीकाठच्या मुस्लीम समाजाच्या दफनभूमी शेजारी ही भली मोठी मगर काही नागरिकांना दिसून आली. यानंतर येथील तरुणांनी प्राणी मित्रांना बोलावून या मगरीला अथक प्रयत्नानंतर पकडले. जवळपास बारा फूट लांबीची महाकाय अशी ही मगर आहे. यानंतर ही मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. तर या मगरीला पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पुराच्या पाण्यात जाताना काळजी घ्यादरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महापुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर अनेक ठिकाणी कृष्णाकाठी मगरींचा मुक्त वावर आणि दर्शन होत आहे. यातच सांगलवाडीजवळ ही महाकाय मगर पकडण्यात आल्याने कृष्णाकाठी भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुराच्या पाण्यामध्ये जाताना काळजी घ्यावी. जर मगर दिसल्यास तातडीने संपर्क साधावा,असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - पूरग्रस्तांना निकषांपेक्षा अधिक मदत देण्याची राज्य सरकारची तयारी, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय