सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये 18 साखर कारखाने आहेत. मात्र, यापैकी यंदाच्या गाळप हंगामामध्ये 13 साखर कारखाने ( 38 Lakh Tonnes of Sugarcane strain in Sangli ) सुरू होऊ शकले ( 41 Lakh Quintal Sugar Production ) आहेत. अन्य पाच साखर कारखाने सुरू होऊ शकले नाहीत. ज्यामध्ये आटपाडीच्या माणगंगा, नागेवाडीचा यशवंत साखर कारखाना, कडेगावच्या डोंगराई येथील केन ऍग्रो, तासगाव येथील तासगाव साखर कारखाना आणि कवठेमहांळच्या महांकाली साखर कारखान्यांची समावेश आहे.
13 साखर कारखान्यांच्या माध्यमातून उसाचे गाळप जोरात 13 साखर कारखान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या उसाचे गाळप जोरात सुरू आहे. इतकेच नव्हे तर अनेक साखर कारखान्यांच्याकडून सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यातूनही ऊस आणून गळप करण्यात येत आहे. पण, याचा फटका सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देखील थोड्याफार प्रमाणात बसत आहे,कारण अनेक शेतकऱ्यांचे ऊस गेल्या चार महिन्यांपासून शेतामध्ये उभा आहे, त्यामुळे उसाला आता तुरे आले आहेत.
13 साखर कारखान्यांच्या माध्यमातून गाळप सुरू ऊस गाळप हंगाम सुरू होऊन चार ते पाच महिने उलटले आहेत आणि आतापर्यंत जिल्ह्यातील 50 टक्के ऊसाचे गाळप झाले आहे. तर 13 साखर कारखान्यांच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत 38 लाख 94 हजार 530 टन ऊसाचे गाळप झाले आहे, तर 41 लाख 67 हजार 504 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
एक नजर टाकूया कारखान्याच्या गाळप आणि साखर उत्पादन आकडेवारीवर..
1) राजरामबापू साखर कारखाना, साखरळे - ऊस गाळप - 3 लाख 76 हजार 145 टन, साखर उत्पादन - 3 लाख 95 हजार 500 क्विंटल, 2) राजरामबापू साखर कारखाना, वाटेगाव - ऊस गाळप - 2 लाख 39 हजार 980 टन, साखर उत्पादन - 2 लाख 83 हजार 500 क्विंटल, 3) राजारामबापू साखर कारखाना, कारंदवाडी - 1 लाख 79 हजार 150 टन, साखर उत्पादन - 2 लाख 15 हजार 350 क्विंटल.
4) राजरामबापू साखर कारखाना, जत - ऊस गाळप - 1 लाख 68 हजार 995 टन, साखर उत्पादन - 1 लाख 87 हजार 170 क्विंटल, 5) हुतात्मा साखर कारखाना, वाळवा - ऊस गाळप - 2 लाख 17 हजार 610 टन, साखर उत्पादन - 2 लाख 7 हजार 75 क्विंटल, 6) मोहनराव शिंदे साखर कारखाना-म्हैसाळ - ऊस गाळप - 2 लाख 26 हजार 500 टन, साखर उत्पादन -2 लाख 43 हजार 400 क्विंटल, 7) क्रांती साखर कारखाना - कुंडल - ऊस गाळप - 4 लाख 5 हजार 130 टन, साखर उत्पादन - 4 लाख 28 हजार 900 क्विंटल.
8) सोनहीरा साखर कारखाना, वांगी - ऊस गाळप - 3 लाख 93 हजार 520 टन, साखर उत्पादन - 4 लाख 49 हजार 600 क्विंटल, 9) वसंतदादा पाटील (दत्त इंडिया) साखर कारखाना, सांगली - ऊस गाळप - 5 लाख 29 हजार 838 टन, साखर उत्पादन - 5 लाख 49 हजार 530 क्विंटल.
10) उदगीरी शुगर - बामणी,विटा - ऊस गाळप - 2 लाख 70 हजार 550 टन, साखर उत्पादन - 2 लाख 92 हजार 850 क्विंटल, 11) विश्वास साखर कारखाना, शिराळा - ऊस गाळप - 2 लाख 98 हजार 550 टन, साखर उत्पादन - 3 लाख 43 हजार 50 क्विंटल, 12) श्री श्री शुगर - राजेवाडी -
ऊस गाळप - 3 लाख 51 हजार 527, साखर उत्पादन - 3 लाख 7 हजार 829 क्विंटल
11) दालमिया शुगर - कोकरूड, शिराळा - ऊस गाळप - 2 लाख 38 हजार 80 टन, साखर उत्पादन - 2 लाख 74 हजार 750 क्विंटल.
एप्रिल महिन्याअखेर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम सुरू राहणार आतापर्यंतच्या हंगामात सांगलीच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा पाटील साखर कारखान्याने सर्वाधिक उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन देखील केले आहे. त्यामुळे अजून उसाच्या गाळप हंगाम सुरू असून गाळप व साखरेचे उत्पादन वाढणार आहे. साधारणपणे एप्रिल महिन्याअखेर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम सुरू राहणार आहे.