ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात आढळले कोरोनाचे नवे 32 रुग्ण ; तर एकाचा मृत्यू

जिल्ह्यात रविवारी कोरोनाचा 13 वा बळी गेला आहे. तर 32 नव्या कोरोना रुग्णांची भर झाली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 4 जणांचा समावेश आहे.

सांगली कोरोना अपडेट
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 6, 2020, 10:56 AM IST

सांगली - जिल्ह्यात रविवारी कोरोनाचा 13 वा बळी गेला आहे. तर 32 नव्या कोरोना रुग्णांची भर झाली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 4 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 504 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या 214 जणांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. उपचार घेणाऱ्या एका वृद्ध कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गणपती पेठ येथील गुजर बोळ याठिकाणी हा वृद्ध राहत होता. शनिवारी तो कोरोना पॉझिटिव्ह आला होता आणि रविवारी मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू असताना वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

कोरोना लागण झालेले जिल्ह्यातील आजचे नवे कोरोना रुग्ण पुढील प्रमाणे - आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी 8, आटपाडी शहर 1, नेलकरंजी 1, जत तालुक्यातील बिळूर येथील 8, पलूस तालुक्यातील अमरापुर येथील 1, तासगाव तालुक्यातील सावळज येथील 3, अंजनी येथील 1, खानापूर तालुक्यातील सळशिंग येथील 1, खानापूर येथील 2, वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील 1 , कडेगाव शहर येथील 1 , सांगली महापालिका क्षेत्रातील खणभाग नगारजी गल्ली येथील 1, 100 फुटी रोड येथील 1 , गणेश नगर 1, कर्नाळ रोड दत्तनगर 1 , असे एकूण 32 जणांचा समावेश आहे. मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेणारे 15 रुग्ण रविवारी कोरोना मुक्त झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.