ETV Bharat / state

मिरजेत भेसळयुक्त तूप कारखान्याचा पर्दाफाश, 270 किलो बनावट तूप जप्त - मिरजेत बनावट तूप कारखान्यावर छापा

मिरजेत भेसळयुक्त तुपाच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे एक लाखाहून अधिक किंमतीचे 270 किलो भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले आहे.

ghee seized
ghee seized
author img

By

Published : Feb 1, 2021, 10:28 PM IST

Updated : Feb 1, 2021, 10:35 PM IST

सांगली - भेसळयुक्त तुपाच्या कारखान्यावर मिरजमध्ये छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे एक लाखाहून अधिक किंमतीचे 270 किलो भेसळयुक्त तुपाचा पदार्थ यावेळी जप्त करण्यात आला आहे. मिरज शहर पोलीस व अन्न व औषध प्रशासनाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

कारवाईची माहिती देताना अधिकारी
भेसळयुक्त तूप कारखान्याचा पर्दाफाश..मिरज शहरातल्या ब्राह्मणपुरी येथील कन्या विद्यालयाशेजारी एका घरामध्ये बेकायदेशीररित्या भेसळयुक्त तूपाच्या पदार्थाची निर्मिती सुरू असल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासह बनावट तूप कारखान्यावर छापा टाकला. यावेळी घरामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त तूप बनवण्यात येत असल्याचे समोर आले. त्यानंतर अन्न व औषध प्राशसनाकडून सुमारे 1 लाख किंमतीचे 269 किलो नकली तूप जप्त करण्यात आले आहे.400 रुपये किलो दराने विक्री..या छाप्यावेळी सूर्यफूल तेल,बटर आणि वनस्पतीचे रिकामे पाऊच आढळून असून याद्वारे हे बनावट तूप बनवले जात होते. या प्रकरणी एम नागलिंगा दुर्गाप्पा मुथलकर आणि डी. चंद्रशेखर कुडलप्पा पल्लेरी या कर्नाटकमधील व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे दोघे मिळून याठिकाणी भेसळयुक्त तूप बनवून 400 रुपये प्रातिकिलो दराने विक्री करत होते. वास्तविक शुद्ध तूप पाचशे ते सव्वा पाचशे रुपये किलो दराने बाजारात मिळते, मात्र हे दोघे कमी दराने भेसळयुक्त तुपाची विक्री करत होते. शहरातील बेकरी तसेच कर्नाटकमध्येही या बनावट तुपाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती समोर आली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली आहे.

Last Updated : Feb 1, 2021, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.