ETV Bharat / state

सांगलीत महापुरानंतर सापांचा वावर, नागरिकांच्या घरांमध्ये आढळले तब्बल 250 साप

पुरासोबत वाहत आलेल्या सापांनी अनेक घरांमध्ये आसरा घेतला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर घरात घुसलेले साप पकडण्यासाठी सर्पमित्र प्रयत्न करत आहेत.

author img

By

Published : Aug 19, 2019, 1:11 PM IST

महापूरानंतर सापांचे संकट

सांगली - महापूर ओसरल्यावर घरी परतणाऱ्या पूरग्रस्तांना आता एका नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. घरात डेरा टाकून बसलेल्या सापांशी पूरग्रस्तांचा सामना होत आहे. गेल्या 4 दिवसात सांगलीसह हरीपूर परिसरात तब्बल 250 हून अधिक साप पकडले आहेत.

सांगलीत महापुरानंतर सापांचे संकट

सांगलीच्या कृष्णा नदीचा महापूर आता ओसरला आहे. पूरग्रस्त आपल्या घरी पोहचत आहेत. पाण्यात बुडालेल्या घरातील घाणीचे साम्राज्य काढणे हे पूरग्रस्तांसमोर आव्हान आहे. मात्र, त्यांना सापांच्या संकटाचाही सामना करावा लागत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या सापांनी अनेक घरांमध्ये आसरा घेतला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर घरात घुसलेले साप पकडण्यासाठी सर्पमित्र प्रयत्न करत आहेत. सर्पमित्रांनी गेल्या 4 दिवसात तब्बल 250 सापांना पकडून सापांना जंगलात सोडून दिले आहे.

सांगलीमध्ये सध्या दररोज 70 साप पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देण्यात येत आहेत. या सापांमध्ये घोणस, मण्यार, नाग, अशा विषारी सापांबरोबर बिन विषारी धामण, टस्कर अशा सर्पांचा समावेश आहे. वन संरक्षण कायद्यानुसार सर्प पकडण्याबाबत निर्बंध आहेत. मात्र, माणसांच्या सुरक्षेला जेथे धोका असेल तेथे सर्प मित्रांची मदत वनविभागाच्या परवानगीने घेतली जात आहे.

Intro:सरफराज सनदी

File name -mh_sng_01_saap_vis_1_7203751 - to -
mh_sng_01_saap_vis_4_7203751

स्लग - महापुरा नंतर सापांचे संकट, तब्बल 250 हुन अधिक सापांना घरातून आले पकडण्यात...

अँकर - महापुर ओसरल्यावर घरी परतणाऱ्या पूरग्रस्तांना आता एका नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. घरात डेरा टाकून बसलेल्या सापांशी पूरग्रस्तांचा सामना होऊ लागला आहे. गेल्या चार दिवसात सांगलीसह हरीपुर परिसरात तब्बल 250 हुन अधिक सापांना पकडले आहे.Body:व्ही वो - सांगलीच्या कृष्णा नदीचा महापूर आता ओसरला आहे.आणि पूरग्रस्त आपल्या घरी पोहचत आहेत.पाण्यात बुडालेल्या घरातील घाणीचे साम्राज्य काढणे हे पूरग्रस्तांसमोर आव्हान असतान, त्यांना आणखी एका संकटाशी आता सामना करावा लागत आहे.तो म्हणजे घरात विळखा घालून बसलेल्या सापांशी, पुरासोबत वाहत आलेल्या सापांनी अनेक घरांमध्ये आसरा घेतल्याचे समोर येत आहे.त्यामुळे पूरग्रस्तांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे.तर घरात घुसलेले साप पकडण्यासाठी सर्पमित्र धाव घेऊन घरात असणाऱ्या या सापांना पकडत आहेत.आणि गेल्या चार दिवसात तब्बल 250 सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडून दिले आहे.
महापुरात रोज साधारणत: 70 साप पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देण्यात येत आहेत.या सापांमध्ये घोणस, मण्यार,नाग अशा विषारी सर्पांपासून ते बिनविषारी असलेल्या धामण,टस्कर अशा सर्पांचा समावेश आहे.वन संरक्षण कायद्यानुसार सर्प पकडण्याबाबत निर्बंध आहेत.पण,माणसांच्या सुरक्षेला जेथे धोका असेल तेथे सर्प मित्रांची मदत वनविभागाच्या परवानगीने घेतली जाते. आणि नेचर कॉंन्झर्वेटिव्ह सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी महापुरातून शहरात आलेल्या अडीचशेहून अधिक सर्पांना घरांतून पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित स्थळी सोडले आहे.

बाईट : मुस्तफा मुजावर, सर्प मित्र Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.