ETV Bharat / state

ट्रक मधून तब्बल २०० लिटर हातभट्टीची दारू जप्त - Sangali Latest

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक इस्लामपूर विभागात राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करत असतांना, एका ट्रकमध्ये हातभट्टीची तयार दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यासंर्दभात बेकायदेशीर हातभट्टी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी संदीप जाधव याला अटक केली आहे.

आरोपीस अटक
आरोपीस अटक
author img

By

Published : Jun 4, 2021, 12:30 PM IST

सांगली - पुणे-बंगलुर आशियायी महामार्गावरील येलूर फाटा येथे बेकायदेशीर हातभट्टीची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी सापळा रचून पकडला आहे. या ट्रकमधून तब्बल २०० लिटर हातभट्टीची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी संदीप नारायण जाधव (वय ३४) रा. पेठनाका ता. वाळवा यालाअटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली असून संशयित संदीप जाधव याच्याकडून पोलिसांनी ट्रकसह साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ट्रक मधून तब्बल २०० लिटर हातभट्टीची दारू केली जप्त

४० हजार रुपयांची हातभट्टीची दारू जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक इस्लामपूर विभागात राष्ट्रीय महामार्गावर चोरी तसचे रोड रॉबरी करणाऱ्यांना आळा बसण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती साळुंखे, सुनील चौधरी यांना येलूर फाटा येथे साई इंटरनॅशनल समोरील रोडवर ट्रक क्र. एम.एच ११ एल ७२८८ मध्ये हातभट्टीची तयार दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने रोडवर उभ्या असलेल्या ट्रकमधील व्यक्तिंची चौकशी केली. त्यानंतर ट्रकमध्ये तपासणी केली असता, त्यात प्लास्टीकच्या पोत्यामध्ये हातभट्टीची २०० लिटर तयार दारू मिळाली. त्याची किमत ४० हजार रुपये इतकी आहे. बेकायदेशीर हातभट्टी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी संदीप जाधव याला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी दारूसह एकूण ७ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जाधव याच्या विरोधात कुरळप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कलम १९४९ चे ६५ (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - देशद्रोह कायद्याचे पुनर्विलोकन - अखेर किती वेळा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.