ETV Bharat / state

संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर 15 नव्या यांत्रिक बोटी कृष्णेच्या पात्रात सज्ज - यांत्रिक बोटी कृष्णा नदीत सज्ज

सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढ सुरू आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास कृष्णा नदीला महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊ प्रशासन नाणे वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने खरेदी केलेल्या 15 नव्या यांत्रिक बोटी शहरात दाखल झाल्या असून कृष्णेच्या पात्रात सज्ज झालेल्या आहेत.

15 motor boat deployed in krishna
15 motor boat deployed in krishna
author img

By

Published : Aug 7, 2020, 12:16 PM IST

सांगली - संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्या प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज सज्ज झाला आहे. सध्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी 23 फुटांवर असून ती स्थिर झाली आहे. मात्र खबरदारी म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने कृष्णेच्या पात्रात आता 15 यांत्रिक बोटी सज्ज ठेवल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढ सुरू आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास कृष्णा नदीला महापूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊ प्रशासन नाणे वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने खरेदी केलेल्या 15 नव्या यांत्रिक बोटी शहरात दाखल झाल्या असून कृष्णेच्या पात्रात सज्ज झालेल्या आहेत.

सांगलीच्या सरकारी घाटावर या यांत्रिकी बोटींना नदीच्या पात्रात आज उतरवण्यात आले आहे. सध्या या बोटींची प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होती, चार दिवसांपूर्वी पाच फुटांवर असणारी पाण्याची पातळी सध्या ती 23 फुटांवर पोहोचली आहे. मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेली पाण्याची वाढ आता थांबली असून सध्या ती 23 फुटांवर स्थिर झाली आहे. मात्र प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. जिल्हा जिल्हा परिषद प्रशासनाकडून पुराच्या पार्श्वभूमीवर नव्या बोटी खरेदी करण्यात आल्या होत्या. 15 यांत्रिकी बोटी असून नदी काठच्या सखल गावांसाठी या बोटी कार्यरत असणार आहेत.

गेल्या वर्षी आलेल्या महापुरामध्ये प्रशासनाला बोटींची मोठ्या प्रमाणात कमतरता भासली होती,आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची आणि यंत्रणेची दमछाक झाली होती. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने नव्या बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने खरेदी केलेल्या या बोटी कृष्णेच्या पात्रात दाखल झाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.