ETV Bharat / state

जत तालुक्यातील दुचाकी चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 16 मोटारसायकली जप्त

जत तालुक्यात पाडोंदरी येथे गुन्हे शाखेकडून छापा टाकण्यात आला. याप्रकरणी एकास अटक करुन त्याच्या ताब्यातून 7 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 16 मोटारसायकली जप्त केल्या.

jath police
जप्त मुद्देमाल व अटक आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Aug 30, 2020, 5:06 PM IST

जत (सांगली) - पाडोंझरी येथे गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 7 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 16 मोटार सायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सागर मोहन पवार (वय 23 वर्षे, रा. पाडोंझडी) यास अटक कण्यात आली आहे. या मोटार सायकली जयसिंगपूर, सोलापूर, विजापूर परिसरातून चोरल्याचे चोरट्याने कबुल केले आहे.

सागर पवार हा चोरीची मोटार सायकल घेऊन संख परिसरात फिरत असल्याचे माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याचा ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली व चोरीच्या मोटार सायकली काढून दिल्या. अटकेत असलेल्या सागर पवार यास जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सहाय्यक फौजदार अच्युत सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी जितेद्र जाधव, अमसिद खोत, राजू शिरोळकर, सतीश अलदर यांनी कारवाई केली.

हेही वाचा - जतमध्ये भांडण सोडविणाऱ्यावर चाकूने वार, दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.