ETV Bharat / state

रत्नागिरीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरते लसीकरण केंद्र, आरोग्य विभागाचा पुढाकार

रत्नागिरी येथे ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगासाठी फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग व रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

फिरते लसीकरण केंद्र
फिरते लसीकरण केंद्र
author img

By

Published : May 28, 2021, 6:16 PM IST

रत्नागिरी - ज्यांचे वय ६५ वर्षांच्या वर आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगासाठी फिरते लसीकरण केंद्र सुरू रत्नागिरीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग व रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, तालुका आरोग्य अधिकारी गावडे यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरते लसीकरण केंद्र, आरोग्य विभागाचा पुढाकार

'रांगेत खूप वेळ उभे राहावे लागते'

ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांगांना लसीकरणावेळी अनेक समस्या निर्माण होतात. खूप वेळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. तसेच, शहरी भागात लसीकरण ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने, डोस मिळण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व बाही लक्षात घेऊन, सौरभ मलूष्टे यांनी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी हे फिरते लसीकरण केंद्र सुरू केले आहे. ही संकल्पना मांडताच, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड व आरोग्य सभापती उदय बने यांनी या संकल्पनेला तत्काळ मंजुरी दिली. रत्नागिरी शहरातील विविध भागात जाऊन ही लसीकरण मोहीम ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

'लसीकरण हाच प्रभावी उपाय'

खऱ्या अर्थाने कोरोनाचा सामना करायचा असेल, तर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण काहीही अडचणी न येता पार पडावे, या तळमळीने मलूष्टे मागील अनेक दिवसांपासून काम करीत आहेत. याबरोबरच, लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मलूष्टे यांनी मोफत रिक्षाचीही व्यवस्था केलेली आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने मलूष्टे यांनी अनेकांच्या अडचणीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपली आहे. लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. मात्र, या फिरत्या लसीकरण सेवेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा मोठा अडचणीचा प्रश्न सुटला आहे.

हेही वाचा - राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढणार ?, काही ठिकाणी शिथिलता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.