रत्नागिरी - काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला होता. अनिल परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत, असेही रामदास कदम यांनी म्हटलं होते. त्यानंतर शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि राज्यात एकनाथ शिंदे व भाजप सरकारला स्थापन झालं. शिंदे गटासोबत आमदार योगेस कदमही होते. आज ( 9 जुलै ) योगेश कदम यांचे मतदारसंघात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परब यांनी माझं वारंवार खच्चीकरण केलं. माझ्यासमोर पडलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ते जिल्हा नियोजनमधून ते निधी देत असत, अशी टीका योगेश कदम यांनी परबांवर केली ( yogesh kadam criticized anil parab ) आहे.
योगेश कदम म्हणाले की, माजी पालकमंत्री अनिल परब यांनी माझं वारंवार खच्चीकरण केलं. माझ्यासमोर पडलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ते जिल्हा नियोजनमधून ते निधी देत असत. मला मात्र कमी निधी देत. राष्ट्रवादीला हाताशी धरून मला संपवलं जात होतं. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना अनिल परब यांनी पदं दिली. दापोली- मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी युती करण्यात आली. मी वारंवार हे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिलं. पण न्याय मिळाला नाही. पण न्याय मिळाला नाही, त्यामुळेच यावेळी मला हा निर्णय घ्यावा लागला, असेही परब यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरे यांना कल्पना होती - मी गुवाहाटीला पळून गेलेलो नाही. मी इथे जातोय याची कल्पना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना दिली होती. मी एकनाथ शिंदे गटात सामील होताना शिवसेना नेते रामदास कदम यांना देखील सांगितलं होतं. तिथे गेल्यानंतर देखील मी वडील या नात्याने रामदास कदम यांच्या संपर्कात होतो, असे योगेश कदम म्हणाले.