ETV Bharat / state

Murder In Ratnagiri : ऍसिड टाकून महिलेचा चेहरा जाळला; नंतर वार करून खून

चिपळूण येथील पेठमाप भागात राहणाऱ्या एका महिलेची घरात कोणी नसताना अज्ञातांनी हत्या ( Woman killed by stabbing ) केली. तिच्या अंगावर ऍसिड टाकून चेहऱ्यावर वार केले. अशा प्रक्रारे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ( woman face burnt with acid ) आहे.

Murder In Ratnagiri
वार करून महिलेचा खून
author img

By

Published : Nov 2, 2022, 5:03 PM IST

रत्नागिरी : चिपळूण येथील पेठमाप भागात राहणाऱ्या एका महिलेची घरात कोणी नसताना अज्ञातांनी हत्या ( Woman killed by stabbing ) केली. तिच्या अंगावर ऍसिड टाकून चेहऱ्यावर वार केले. अशा प्रक्रारे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ( woman face burnt with acid ) आहे. मृत महिला ही आपल्या मुलासोबत पेठमाप येथे राहत होती. सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे गेला असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे. कुलसूम अन्सारी असे मृत महिलेचे नाव असून चिपळूण पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्याने खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तापसकाम सुरू केले.

आईला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न : दरम्यान मृत महिलेचा मुलगा हा आपल्या आईला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा 1 पण फोन आईने उचलला नाही. त्यावेळी मुलाने आपल्या मित्रांना घरी जाण्यासाठी सांगितले. ज्यावेळी मित्र घरी पोहोचले त्यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी घाबरलेल्या मित्रांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी घरात कुलसूम अन्सारी यांचा मृतदेह एका बाजूला झाकून ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांकडून घटनेचा पंचनामा : पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. मंगळवारी कुलसूम अन्सारी यांचा दफनविधी पोफळी सय्यदवाडी येथील कब्रस्थानमध्ये करण्यात आला. दरम्यान या महिलेचा खून हा चोरीच्या प्रयत्नात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरी खरा खुनी कोण आहे. याचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी कसून तपास सुरू केला ( Suspected attempted theft ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.