ETV Bharat / state

Whale Fish Rescue : गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी अडकलं व्हेल माशाचं पिलू; त्याला अथक प्रयत्नांनी सोडलं समुद्रात - व्हेल मासा बचावकार्य

Whale Fish Rescue : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे सोमवारी (Whale Fish Rescue in Ganapatipule) एक विशालकाय व्हेलमासा समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर आला. त्याला जीवनदान देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर दोन दिवसांनंतर त्या माशाला समुद्रात सोडण्यात यश आलं.

Whale Fish Rescue
व्हेल मासा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 3:58 PM IST

Updated : Nov 15, 2023, 4:40 PM IST

समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाच्या बचावकार्याला अखेर यश

रत्नागिरी Whale Fish Rescue : तालुक्यातील धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ३० ते ३५ फूट लांबीचा जिवंत व्हेल मासा (Whale Fish at Ganapatipule Beach) आला होता. त्याला वाचवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह वनविभागाचे कर्मचारी दोन दिवस प्रयत्न करत होते. अखेर या व्हेल माशाला समुद्रात सोडण्यात यश आलं आहे. रात्री उशिरापर्यंत या माशाच्या रेस्क्यूचं काम सुरू होतं. (whale released into sea)

ओहोटीमुळे मासा वाळूवर आला : समुद्रकिनारी सोमवारी आलेल्या या व्हेल माशाची माहिती वन विभागाला कळविण्यात आली. सकाळी भरतीला किनाऱ्यावर पाणी असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, किनाऱ्यावरील व्यापारी, वॉटर स्पोर्टस् संस्था, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ('एमटीडीसी') मधील कर्मचाऱ्यांनी त्या व्हेल माशाला खोल समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला; परंतु लाटांमुळे व्हेल मासा पुन्हा समुद्रकिनारी वाहत आला. ओहोटी सुरू झाल्यानंतर मासा वाळूवर आला होता. त्याला पाणी मिळावं म्हणून जेसीबी आणून खड्डा खणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी याची माहिती मत्स्यविभागालाही कळविली होती. दुपारी उन्हाचा कडाका असल्यामुळे व्हेलला त्याचा त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

माशाला समुद्रात ढकलण्यासाठी कसरत : त्या माशाच्या सुरक्षिततेसाठी कापडामध्ये गुंडाळले गेले. त्याच्या अंगावर नियमितपणे पाणी ओतण्यात येत होतं. बादल्या भरून ग्रामस्थ हे काम करत होते. भरती आल्यानंतर पाणी हळूहळू किनाऱ्याकडे येऊ लागले. लाटांनाही जोर होता. दोन जेसीबीच्या मदतीनं व्हेल माशाला पाण्याच्या दिशेनं ढकलण्यात आलं. पाण्यात गेल्यानंतर वॉटर स्पोर्टवाल्यांच्या बोटीनं त्याला खोल पाण्यात नेण्यासाठी कसरत सुरू होती. व्हेलला दोरीच्या साह्याने व्यवस्थित दोन्ही बाजूनं बांधून ठेवलं होतं. यासाठी मत्स्य विभागाची नौकाही मागविण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी देखील हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. तब्बल 45 तासांपेक्षा अधिक काळ हा व्हेल मासा किनाऱ्यावर होता. सर्वच शासकीय यंत्रणा या माशाला जीवनदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. तीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतकं या माशाचं वजन होतं. इतक्या वजनाच्या या माशाला समुद्रात सोडणं सोपं नव्हतं. मात्र याला वाचवण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरू झालं आणि मंगळवारी रात्री उशिरा या माशाला समुद्रात सोडण्यात यश आलं.

यांच्या प्रयत्नांमुळे माशाला जीवनदान : हे रेस्क्यू गणपतीपुळेमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कर्मचारी, ग्रामपंचायत गणपतीपुळेचे जीवरक्षक आणि कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी, गणपतीपुळे पोलीस, दूरक्षेत्र कर्मचारी, मेरिटाईम बोर्ड कर्मचारी आणि गणपतीपुळे वॉटर स्पोर्टस्, किनाऱ्यावरील व्यावसायिक, देवस्थानचे कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरू होतं. दरम्यान, व्हेल माशाला पाहण्यासाठी ग्रामस्थांसह पर्यटकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा:

  1. Whale Fish खोल समुद्रात बोटीसमोर आला व्हेल मासा, पहा व्हिडिओ
  2. वसईत सुरुची बीचवर आढळला भला मोठा व्हेल मासा
  3. मच्छीमारांनी जाळे कापून केली व्हेल माशाची सुखरूप सुटका; पालघर येथील घटना

Last Updated : Nov 15, 2023, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.