ETV Bharat / state

कोरोना अपडेट : 'गोव्याच्या धर्तीवर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ‘ट्रु नेट’ मशिन खरेदी करणार'

कोरोना तपासणीदरम्यान मिरज येथील लॅबवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे मर्यादीत नमुने पाठवावे लागत असून त्याचा अहवाल यायलाही उशिर होतो. म्हणून गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रु नेट’ मशिन खरेदी करणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक मशिन असेल.

author img

By

Published : May 15, 2020, 1:34 PM IST

उदय सामंत
उदय सामंत

रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रु नेट’ मशिन खरेदी करणार आहोत. या दोन्ही जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी प्रत्येकी एक मशिन असेल. ही मशिन जिल्हा रुग्णालयात बसविण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना सामंत म्हणाले, कोरोना तपासणीदरम्यान मिरज येथील लॅबवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे मर्यादित नमुने पाठवावे लागतात. त्याचा अहवाल यायलाही उशिर होतो. म्हणून आम्ही गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रु नेट’ मशिन खरेदी करणार आहोत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक मशिन असेल. या मशिनमध्ये तासाला 4 तपासण्या होऊ शकतील, पण ही मशिन निगेटिव्ह रिपोर्टच देते.

त्यामुळे चाकरमान्यांच्या तपासणी लवकर होतील. तासाला ४ तपासण्या होऊ शकतील आणि ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येईल. तर, ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येणार नाही, त्याचे स्वॅब घेऊन ते मिरजला पाठवले जातील. या माध्यमातून अहवाल लवकर येऊन कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. यामुळे, लॅबवर ताण पडणार नाही आणि अहवालही लवकर मिळेल. येत्या आठ दिवसामध्ये ही मशिन येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.