ETV Bharat / state

Governor Appointed MLAs Seat : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार - मंत्री सामंत - Governor Appointed MLAs Seat

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रलंबित प्रश्नाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. याबाबत विधितज्ज्ञांचा घेऊन या प्रकरणी आपण पुढाकार घेवून सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाकडे ( Supreme Court ) दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी दिली आहे.

मंत्री सामंत
मंत्री सामंत
author img

By

Published : Jan 29, 2022, 7:35 PM IST

रत्नागिरी - भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रलंबित ( Governor Appointed MLAs Seat ) प्रश्नाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी आपण पुढाकार घेवून सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाकडे ( Supreme Court ) दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी दिली आहे. ते आज (दि. 29 जानेवारी) रत्नागिरीत बोलत होते.

बोलताना मंत्री सामंत

मंत्री सामंत म्हणाले, विधितज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण यासाठी स्वतः पुढाकार घेणार आहोत. नितीन बानगुडे पाटील यांच्या माध्यमातून मी स्वतः दाद मागण्याचा विचार करत आहे. बारा आमदारांचे निलंबन रद्द झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम्हालाही न्याय मिळेल, यासाठी हा प्रयत्न असणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) सर्वांशी चर्चा करणार आहोत. पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा झाली असल्याचेही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना आणि काँग्रेसला राष्ट्रवादी खाऊन टाकेल या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांच्या विधानावरून मंत्री उदय सामंत भाजपवर प्रहार केला आहे. तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे, या आघाडीत बिघाडी करण्याचा विचार काही जण करत आहेत. पुढच्या पावणेतीन वर्षात हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्यासाठी असे विधान करून हे शक्य होईल का यासाठी हा प्रयत्न सुरू आहेत. या विधानाकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो. महाविकास आघाडी भक्कम आहे. आपले कार्यकर्ते इकडे तिकडे जावू नयेत म्हणून अशी विधाने केली जात असल्याच सांगत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आपला पक्ष एवढा श्रीमंत असताना दुसऱ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का याचे आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी केले पाहिजे, असे सांगत उदय सामंत यांनी भाजपाचे नाव न घेता टीका केली आहे.

हेही वाचा - Uday Samant : अब्दुल सत्तार यांनी युतीबाबत केलेले विधान हे त्यांचं वैयक्तिक मत - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.