ETV Bharat / state

दुष्काळाच्या झळा आता कोकणालाही, रत्नागिरीत हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ जीवावर उदार - मोलमजुरी

रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये गावातल्या पड्यारवाडीत भीषण पाणीटंचाई आहे. येथील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी जीवावर उदार होऊन जीर्ण झालेल्या विहिरीत उतरावे लागत आहे. विहिरीत फक्त एकच पाण्याचा झरा असून, तो ग्रामस्थांची तहान भागवत आहे.

रत्नागिरीत हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ जीवावर उदार
author img

By

Published : May 13, 2019, 1:42 PM IST

Updated : May 14, 2019, 9:59 AM IST

रत्नागिरी - विदर्भ-मराठवाड्यात पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कोकणातही दिसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करायचे आणि पाण्याच्या एका हंड्यासाठी रात्री पोराबाळांसह विहिरीतील खड्ड्यात साठलेले पाणी भरण्यासाठी रात्र जागवायची, अशी परिस्थिती सध्या रत्नागिरीतल्या ग्रामस्थांवर आली आहे. रत्नागिरीत कुठे आहे हे भयाण वास्तव, का होत आहे लोकांची परवड. पाहूया यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट.

रत्नागिरीत हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ जीवावर उदार

रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये गावातल्या पड्यारवाडीतील विहिरींनी दोन महिन्यापूर्वीच तळ गाठला आहे. त्यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरीत झिरपणाऱ्या एका झऱ्याद्वारे वाडीतील ७० कुटुंब आपले तहान भागवत आहेत. मात्र, या पाण्याच्या थेंबासाठी लोकांना आपल्या जीवाशी खेळावे लागत आहे. ३५ फूट खोल असलेल्या या विहिरीतील खड्ड्यात झऱ्यातून पाणी साठते. हे साठलेले पाणी भरण्यासाठी विहिरीच्या जीर्ण झालेल्या पायऱ्यांवरून तारेवरची कसरत करत त्यांना उतरावे लागते. बॅटरीच्या प्रकाशात त्यांची ही चढाओढ सुरु असते. पुरुषांबरोबर स्त्रिया, लहान मुलेही जीवाची पर्वा न करता या पाण्यासाठी जीवावर उदार होत विहिरीत उतरतात. अशीच स्थिती राहिली तर जीवनच कठीण असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

याच पड्यावरवाड्यात राहणारी साक्षी ही मुलगी १२ वीत शिकत आहे. मात्र, मागील कित्येक वर्षांत साक्षीने उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाचे तोंडही पाहिलेले नाही. याचे कारण आहे पाणी. मोलमजुरीसाठी आईवडील दिवसभर घराबाहेर असल्याने पाण्यासाठी वणवण करण्याची जबाबदारी साक्षीवर आहे. तासनतास थांबल्यानंतर एक ते दोन हंडे भरायचे. त्यानंतर पुन्हा रांगेत उभे रहायचे, असे साक्षीचे दररोजचे काम.

सध्या या ७० कुटुंबाना टँकरच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. दोन वर्षांपूर्वी या वाड्याला टँकरचे पाणी मिळाले होते. दरम्यान, यावर्षीही टँकरची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाने गावाला अजबच उत्तर दिले. दुष्काळनिर्मित गावालाच टँकर दिला जातो. जिथे विहिरी नाहीत त्याला दुष्काळनिर्मित गाव म्हटले जाते. मात्र, तुमच्या गावात विहिरी आहेत. त्यामुळे तुम्हाला टँकर देता येणार नाही, असे खुद्द तहसीलदारांनीच संगीतल्याचे ग्रामपंचायत सदस्या सिद्धी वाडकर यांनी सांगितले.

भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणात हे भीषण वास्तव पहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक गावांतही अशीच स्थिती आहे. मात्र, कधीकधी लोकांचा आठमुठेपणाही याला जबाबदार ठरतो. पड्यारवाडीसाठी बोअरवेल मंजूर आहे. मात्र, जमिनीच्या वादावरून ती रखडली. वाद नसता तर पाण्यासाठी अशी वणवण करण्याची वेळ आली नसती, असे ग्रामस्थांना वाटते. त्यामुळे निदान पाण्यासाठी तरी गावकऱ्यांनी एक होणे आवश्यक आहे.

Intro:पाणी टंचाईचं भिषण वास्तव

पाण्यासाठी केळ्ये गावातल्या पड्यारवाडीतील लोकांना करावा लागतोय जिवाशी खेळ

रत्नागिरी, प्रतिनिधी

3 हजार मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडणाऱ्या कोकणातही पाणी टंचाईचं भिषण वास्तव पाहायला मिळत आहे. विदर्भ- मराठवाड्यात पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कोकणातही दिसतोय.. पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करायचे आणि रात्री पोराबाळांसह पाण्याच्या एका हंड्यासाठी तळ गाठलेल्या विहिरीतील एका झऱ्याकडे डोळे लावून बसायचं.. पाण्यासाठी जीवावर उदार होऊन विहिरीत उतरायचं, आणि विहिरीतील खड्ड्यात साठलेलं पाणी भरण्यासाठी रात्र जागवायची... रत्नागिरीत कुठे आहे हे भयाण वास्तव, का होतेय लोकांची परवड, पाहूया यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट

Vo.. 1.. (MH RATNAGIRI WATER PROBLEM V1 SAKSHI)

किर्द काळोखात मध्यरात्री पाण्याकडे डोळे लावून असलेली ही आहे साक्षी खवळे.. रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये गावातल्या पड्यारवाडीतील ही साक्षी 12 वीला आहे.. मात्र गेल्या कित्येक वर्षांत साक्षीने उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावचं तोंडही पाहिलेलं नाही.. कारण.. पाणी... मोलमजुरीसाठी आईवडील दिवसभर घराबाहेर... मग पाण्यासाठी वणवण करण्याची जबाबदारी येते ती साक्षीवर.. तासंतास थांबल्यानंतर एक ते दोन हंडे भरायचे.. पुन्हा नंबरात उभं रहायचं.. आणि दिवसाही तेच काम साक्षीचं..

Byte- 1-- साक्षी खवळे

Vo.2.. पड्यारवाडीतील विहिरींनी दोन महिन्यापूर्वीच तळ गाठला आहे.. त्यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरीत झिरपणाऱ्या एका झऱ्यावर वाडीतील 70 कुटुंबाची मदार.. मात्र या पाण्याच्या थेंबासाठी लोकांना करावा लागतो जीवाशी खेळ.. 35 फूट खोल असलेल्या या विहिरीतील जीर्ण झालेल्या पाय-यांवरून जीवाची पर्वा न करता खाली उतरायचं.. चुकून तोल गेला तर कपाळमोक्ष ठरलेलाच.. अशी तारेवरची कसरत करत विहिरीत उतरायचं आणि झऱ्यातून खड्ड्यात साठलेलं पाणी भरण्यासाठी बॅटरीच्या प्रकाशात सुरू होते चढाओढ.. पुरुषांबरोबर स्त्रिया, लहान मुलंही जीवाची पर्वा न करता या पाण्यासाठी जीवावर उदार होत विहिरीत उतरतात.. अशीच स्थिती राहिली तर जीवनच कठीण असल्याचं ग्रामस्थ सांगतात..

Byte- 2.. सागर

Vo. 3.. या सत्तर कुटुंबाना सध्या टँकरच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे.. दोन वर्षांपूर्वी टँकरचं पाणी मिळालेलंही होतं.. यावर्षीही टँकरची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने गावाला अजबच उत्तर दिलं.. दुष्काळनिर्मित गावलाच टँकर दिला जातो, दुष्काळनिर्मित कोणाला म्हणायचं तर जिथे विहिरी नाहीयेत.. तुमच्या गावात विहिरी आहेत त्यामुळे तुम्हाला टँकर देता येणार नाही असं खुद्द तहसीलदारांनीच संगीतल्याचं ग्रामपंचायत सदस्या सांगतात..
Byte --3.. सिद्धी वाडकर, ग्रामपंचायत, सदस्य

Vo..4.. भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणात हे भीषण वास्तव पहायला मिळत आहे.. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक गावांत ही अशीच स्थिती आहे.. मात्र कधीकधी लोकांचा आठमुठेपणाही याला जबाबदार ठरतो.. पड्यारवाडीसाठी बोअरवेल मंजूर आहे.. मात्र जमिनीच्या वादावरून ती रखडली.. वाद नसता तर पाण्यासाठी अशी वणवण करण्याची वेळ आली नसतं, असं ग्रामस्थांना वाटतं.. त्यामुळे निदान पाण्यासाठी तरी गावकऱ्यांनी एक होणं आवश्यक आहे.. नाहीतर... निर्ढावलेलं प्रशासन आणि उदासीन शासनकर्ते तुमच्या जखमेवर मीठ चोळतच राहणार..

राकेश गुडेकर, ई टीव्ही भारत रत्नागिरीBody:पाणी टंचाईचं भिषण वास्तव

पाण्यासाठी केळ्ये गावातल्या पड्यारवाडीतील लोकांना करावा लागतोय जिवाशी खेळConclusion:पाणी टंचाईचं भिषण वास्तव

पाण्यासाठी केळ्ये गावातल्या पड्यारवाडीतील लोकांना करावा लागतोय जिवाशी खेळ
Last Updated : May 14, 2019, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.