ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटना : भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने धरण फुटले; जलसंधारण अधिकाऱ्यांचा दावा - तिवरे धरण दुर्घटना

अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ओली माती आणि कोरडी माती यांच्यामध्ये जो काही समन्वय साधला जातो त्यामध्ये फरक पडला असावा. त्यामुळे हे धरण फुटल्याची शक्यता असल्याचे जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बचाव मोहीम
author img

By

Published : Jul 4, 2019, 8:40 PM IST

रत्नागिरी - तिवरे धरणाच्या भिंतीचे बांधकाम व्यवस्थित न झाल्यामुळे धरण फुटल्याची शक्यता असल्याचे जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंबंधी ग्रामस्थांनी जलसंधारण खात्याला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे आता धरण फुटल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई वळली आहे. त्यामुळे जलंसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाबाबतचा खुलासा केला आहे.

तिवरे धरणफुटीवर स्पष्टीकरण देताना जलसंधारण विभागाचे अधिकारी

काय आहे नेमकी तिवरे धरण दुर्घटना? वाचण्यासाठी इथं क्लिक करा....

तिवरे धरणाचे बांधकाम २००४ साली पूर्ण झाले. त्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यात धरण खचल्याचे पत्र मिळाले. त्यानंतर माती आणून त्याठिकाणी उतारात पडलेला खड्डा बुजवण्यात आला. गेल्या १ तारखेला धरण फक्त २५ ते ३० टक्केच भरले होते. मात्र, २ तारखेला कोयना परिसरातील नौजा येथे १९० मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे पाण्याची पातळी अचानक ९ मीटरने वाढली. त्यामुळे सांडवा भरून वाहू लागला. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ओली माती आणि कोरडी माती यांच्यामध्ये जो काही समन्वय साधला जातो त्यामध्ये फरक पडला असावा. त्यामुळे हे धरण फुटल्याची शक्यता असल्याचे जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:(काल पाठवलेले ड्रोन viz ही या बातमीत वापरता येतील) धरणाला भगदाड पडल्याची अगोदरची एक viz फाईल यासोबत पाठवत आहे)

भिंत फेल गेल्यामुळे धरण फुटल्याची शक्यता
- जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची कारणं

रत्नागिरी, प्रतिनिधी

धरणाची भिंत फेल गेल्यामुळे तिवरे धरण फुटण्याचं एक कारण असू शकतं अशी शक्यता जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तिवरे धरण फुटलं आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांवर संशयाची सुई वळली. इथले ग्रामस्थ जलसंधारण खात्याला वेळोवेळी पत्रव्यवहार करत होते.त्यामुळे जलसंधारण खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित रहातायत. त्यामुळे या धरणासंदर्भातला खुलासा जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. धरण 2004 साली पूर्ण झालं, धरण खचल्याचे पत्र फेब्रुवारी 2019 ला मिळालं. त्यानंतर माती खोदून बाहेरून माती आणून पडलेला खड्डा बुजण्यात आला होता. हा खड्डा उतारात होता. 1 तारखेला धरण 25 ते 30 टक्के भरलं होतं मात्र 2 तारखेला कोयना परिसरातील नौजा येथे 190 मिलिमीटर पाऊस 7 ते 8 तासात झाला त्यामुळे पाण्याची पातळी 9 मिटरने अचानक वाढली . सांडवा भरून वाहून लागला. अचानक पाण्याची पातळी वाढली त्यामुळे ओली माती आणि कोरडी माती यांच्यामध्ये जो काही इक्विलिबियन्स साधला जातो ते एक कारण धरण फुटायला असू शकतो. तसेच तसेच धरणाची खालची भिंत ती फेल गेल्यामुळे देखील धरण फुटल्याच म्हणता येईल असा दावा केलाय जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय.

बाईट-१- प्रकाश एकनाथ देशमुख, जिल्हा जलसंधारण अधिकारी
बाईट-२- दिलीप जोकार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी दापोलीBody:भिंत फेल गेल्यामुळे धरण फुटल्याची शक्यता
- जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची कारणंConclusion:भिंत फेल गेल्यामुळे धरण फुटल्याची शक्यता
- जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची कारणं
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.