रत्नागिरी: खेड तालुक्यातील केळणे गोमळेवाडी येथील लग्नकार्यासाठी मुंबईतील परेल येथून नातेवाईक निघाले होते. मध्यरात्री परेल येथून निघालेली खासगी आराम बस महामार्गावरील भरणे नाका परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक पोहचली त्यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला खड्ड्यात उलटली. हस भरधाव वेगात होती.अपघात होताच बसमधील प्रवाशांनी जोरात आरडाओरड केली.
अपघातादरम्यांन झालेला जोरदार आवाज आणि प्रवाश्यांचा आरओरडा ऐकून ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम ग्रामस्थांनी केले. दरम्यान खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना तत्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची खबर केळणे गावात कळताच ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.
अपघातग्रस्तची नावे
वनिता महेंद्र गोमले-५८
अविनाश रामचंद्र गोमले-३१
अल्पेश अरुण गोमले-३४
संदिप तुकाराम गोमले-४५
अनंत सिताराम खेराडे-६७
राजाराम धोंडु गोमले-५२
रविंद्र धोंडु साळुंखे-६१
वैजयंती लक्ष्मण गोमले-५५
विठ्ठल धोंडु बोले-५६
लक्ष्मण महादेव गोमले-६६
ओंकार भगवान गोमले-२६
मनोहर सदाशिव गोमले-६२
भावेश बाबु गोमले-१९
अस्मिता सोनू गोमले-५८
बाळकृष्ण तुकाराम गोमले-६४
नितेश मधुकर गोमले-२३
दशरथ राजाराम गोमले-४५
अल्पेश विजय गोमले-२८
दिनेश विजय गोमले-२६
महेंद्र दत्ताराम गोमले-३२
अस्मिता अंकुश गोमले-४५
सदानंद बाबू गोमले-४७