रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. (voting for 155 sarpanch in Ratnagiri). जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीपैकी 163 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी तर 155 सरपंचपदासाठी मतदान होत आहे. 507 मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा शनिवारपासूनच सज्ज झाली आहे. (Ratnagiri Grampanchayat Election).
67 सरपंच बिनविरोध : जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील तब्बल 67 सरपंच व 1100 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. आता जिल्ह्यात 155 सरपंच तर 666 सदस्यपदांसाठी निवडणूक होते आहे. सरपंचपदासाठी 406 तर सदस्यपदांसाठी 1206 उमेदवार रिंगणात असून 507 मतदान केंद्रावर मतदान होत आहे.