रत्नागिरी - खासदार नारायण राणे यांनी सोमवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या एका प्रचार सभेत शिवसैनिक आणि भाजपचा आपल्याला आतून पाठींबा असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा खरपूस समाचार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतिचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत घेतला. गद्दारी आणि बेईमानी राणेंच्या नसानसात भिनलेली असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनिक आणि भाजपचा आतून पाठींबा असल्याच्या राणेंच्या वक्तव्यावर टीका करताना राऊत म्हणाले0, राणेंच्या या भूलथापा नेहमीच्याच आहेत. शिवसेना, भाजप, आरपीआय, रासपमध्ये गद्दारी व बेईमानी नाही, ती राणेंच्या नसानसात भिनलेली आहे. उमेदवारी अर्ज भरताना आमचा उद्देश शक्ति प्रदर्शन करण्याचा नव्हता, तर तो आपुलकीपोटी आलेला जनसमुदाय होता, आम्हाला ही निवडणूक विकासावर लढवायची आहे, त्यामुळे बेछूट आरोपांना ऊत्तर देणे आम्हाला गरजेचे वाटत नसल्याचे राऊत म्हणाले.