रत्नागिरी - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातीलही मालमत्तांचा लिलाव होणार आहे. गेल्यावर्षी या मालमत्तांचे मूल्यांकन झाले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम.. मोस्ट वाॅन्टेड गुन्हेगार.. पण हा दाऊद मूळचा कोकणातला... रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुंबके हे दाऊदचे गाव.. या गावासह तालुक्यातील अन्य भागात दाऊदच्या मालमत्ता आहेत.
या सर्व मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर आणि आई अमिना यांच्या नावे आहेत. खेडमधील मुख्य मालमत्ता या दाऊदची बहिण हसीनाच्या नावे आहेत, तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमिना बीच्या नावे आहे. दाऊदचे बहीण-भाऊ मुंबईतल्या पाकमोडिया स्ट्रीटवर राहतात. हे सर्व लोक 1980 च्या दशकात खेडच्या बंगल्यात यायचे. मात्र 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर हा बंगला ओस पडला आहे. सध्या या घराची अवस्था खंदकाप्रमाणे आहे. गेली अनेक वर्ष पडून असलेल्या या घराभोवती मोठमोठाली झाडे वाढली आहेत. तीन मजली टोले जंग असलेली ही इमारत कधीही कोसळेल अशीच आहे.
हेही वाचा - नाणार प्रकल्पातील जमीन व्यवहारांची होणार चौकशी
गेल्या वर्षी या मालमत्तेच्या मूल्यांकनाला सुरुवात झाली होती. मूल्यांकन करण्यासाठी 'साफेमा' आणि प्राप्तिकर विभागाचे पथक मुंबके गावात दाखल झाले होते. या पथकांनी दाऊदच्या बंगल्याची, जागेची पाहणी केली. आजही प्राप्तिकर विभागाचे पथक मुंबके गावात दाखल झाले होते. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे असणाऱ्या मालमत्तेची यावेळी पाहणी करण्यात आली. दरम्यान, आता 'स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स ऍक्ट' अंतर्गत या संपत्तीचा लिलाव होणार आहे.
काय आहेत मालमत्ता
सर्व्हे नंबर 150 - 20 गुंठे जागा (मुंबके गाव)
सर्व्हे नंबर 157 - 27 गुंठे जागा
सर्व्हे नंबर 152 - 29 गुंठे
सर्व्हे नंबर 153 - 24 उंठे
सर्व्हे नंबर 155 - 18 गुंठे
सर्व्हे 181 - 27 गुंठे ( 2 मजली बंगला, घर नंबर -178-, 172
सर्व्हे नंबर 81 - 30 गुंठे जागा (पेट्रोल पंप, इतर इमारत, (लोटे-खेड)
या सर्व मालमत्तांची किंमत जवळपास 1 कोटींच्या आसपास आहे.
घराची स्थिती
दाऊदने 1978-79 मध्ये घर बांधायला सुरुवात केली होती. 1980 साली घर बांधून झाले. तीन मजली हे टोलेजंग घर असून दाऊदच्या आईच्या नावावर आहे. हे घर सरकारच्या ताब्यात जाण्याअगोदर काही दिवस या इमारतीमध्ये दाऊदची लहान बहीण राहत होती. तिच्या मृत्यूनंतर या घरात न राहण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी घेतला होता. सध्या हे घर एखाद्या खंदकाप्रमाणे आहे. गेली अनेक वर्षे पडून असलेल्या या घराभोवती सध्या मोठमोठाली झाडे वाढली आहेत. कधीही कोसळेल अशी अवस्था या घराची आहे.
हेही वाचा - भर बाजारपेठेत फोडलं एटीएम, रत्नागिरी शहरातील घटना