ETV Bharat / state

'अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट ५ टक्क्यांनी शिथील'

author img

By

Published : Oct 12, 2020, 1:13 AM IST

अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट ५ टक्क्यांनी शिथील करण्यात आली आहे. यामुळे सीईटीमध्ये किमान १ गुण आणि बारावीला किमान ४५ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यालाही प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत

रत्नागिरी - अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट ५ टक्क्यांनी शिथील करण्यात आली आहे. यामुळे सीईटीमध्ये किमान १ गुण आणि बारावीला किमान ४५ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यालाही प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच गणित (पीसीएम) या तीन विषयांमध्ये किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. यापूर्वी ही अट अनुक्रमे ५० व ४५ टक्के इतकी होती. नव्या निकषांनुसार पाच टक्क्यांची अधिक सवलत देण्यात आली आहे. अभियांत्रिकी तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे करायचे याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारने प्रसिद्ध केले आहे.

'अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट ५ टक्क्यांनी शिथील'

कर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही ही अट शिथिल करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र गुणवत्तेचा विचार करत ती मान्य केली जात नव्हती. अभियांत्रिकी सोबतच औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधी पाच वर्षे अभ्यासक्रम, बॅचलर इन फाइन आर्ट, बॅचलर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठीचे बारावीच्या किमान गुणांची अट ही ५० व ४५ टक्क्यांवरून अनुक्रमे ४५ व ४० टक्के अशी करण्यात आली आहे. यामुळे कमी गुण मिळालेले विद्यार्थी बाहेरच्या राज्यात प्रवेश घेण्यासाठी जातात. मात्र या निर्णयामुळे ते तेथे न जाता आपल्या राज्यात प्रवेश घेतील, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.