रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील पडवे बंदर येथे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे. पडवे बंदर येथील खाडीपात्रात दोन शाळकरी मुले बुडाली आहेत. ऋत्विक भोसले आणि कुलदीप वारंग अशी दोघांची नावे आहेत. दोघेही पडवे गावातील टुकरूल वाडी येथील रहिवासी आहेत. दोघेही अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
मुले गणपती विसर्जन करण्यासाठी गेली असताना हा प्रकार घडला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ऋत्विक आणि कुलदीप दोघेही मुंबईत वास्तव्याला होते. मात्र, गणेशोत्सवासाठी ते गावी आले होते. या घटनेमुळे पडवे गावावर शोककळा पसरली आहे.