ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी बेकायदेशीर कॉल सेंटर चालविणाऱ्या दोघांना एटीएसकडून अटक

रत्नागिरी शहरातून हायस्पीड इंटरनेटद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याचे मुंबई एटीएसला समजले होते. त्यांनी याची माहिती रत्नागिरी दहशदवाद विरोधी पथकाला दिली. यानंतर आठवडा बाजार येथील मोबाईल दुकानावर पोलिसांनी धाड टाकली आणि दुकान मालकासह कॉल सेंटर चालविणाऱ्या मास्टर माईंडला त्यांनी अटक केली आहे.

Two arrested operating unauthorized calling center in ratnagiri
आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी बेकायदेशीर कॉलिंग सेंटर चालविणाऱ्या दोघांना अटक
author img

By

Published : Aug 14, 2021, 12:48 PM IST

रत्नागिरी - हायस्पीड इंटरनेटद्वारे सिप ट्रंक सिस्टिममार्फत देशासह आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी कॉल सेंटर चालविणाऱ्या टोळीचा मास्टर माईंड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याच्यासह मोबाईल शॉपी मालकाला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. तर या सिस्टिमचा आधार घेऊन परदेशात दहशतवादी कारवायांसाठी याचा वापर होत होता का? याचा शोध पोलीस घेत आहेत. अशा प्रकारची सिस्टिम शहरातील आठवडा बाजार येथे मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

  • दुकानमालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात -

रत्नागिरी शहरातून हायस्पीड इंटरनेटद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल होत असल्याचे मुंबई एटीएसला तंत्रज्ञानाद्वारे समजले होते. त्यांनी याची माहिती रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाला दिली. यानंतर आठवडा बाजार येथील मोबाईल दुकानावर पोलिसांनी धाड टाकली. रत्नागिरीतून आंतरराष्ट्रीय कॉलसाठी बसवण्यात आलेल्या सर्व्हरसह दुकान मालक अलंकार अरविंद विचारे (रा. छत्रपतीनगर, रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • मुबंईच्या वांद्रेमधील इमारतीत कॉल सेंटर

इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविण्यासाठी आठवडा बाजार येथील श्रीटेक दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात कॉलिंगचा सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच आंतरराष्ट्रीय कॉलिंग सुरू होते. मोबाईल शॉपी मालकाच्या नावे एका खाजगी कंपनीचे हायस्पीड इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. त्यामार्फत येथील सर्व्हरवरुन कॉलिंग सेंटर मुबंईतील वांद्रेमधील एका इमारतीतून सुरू होते. वाईप अॅपद्वारे हे इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते, अशी माहिती दुकानमालक अलंकार विचारे याने पोलिसांना दिली आहे.

  • सापळा रचून कारवाई -

या प्रकरणातील मास्टर माईंड म्हणून ओळखला जाणारा फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) हा रत्नागिरीत येत असल्याची माहिती रत्नागिरी एटीएसला मिळाली होती. या माहितीवरुन साळवी स्टाॅप येथे सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी फैसल याला मोठ्या शिताफीने साळवी स्टॉप येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अलंकार विचारे व फैसल सिद्दीकी या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ३४, आयटी अॅक्ट ४३ (ह), ६६ (ड), इंडियन टेलिग्राफीक अॅक्ट ४, २०, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करीत आहेत.

  • सर्व्हर रत्नागिरी व सेंटर मुंबईत का? -

आंतरराष्ट्रीय कॉलचा वापर केवळ परदेशात बोलण्यासाठी झाला की दहशदवाद कारवायांसाठी याचा वापर होत होता का? तसेच केवळ कॉलिंग करायचे असेल तर सर्व्हर रत्नागिरी व सेंटर मुंबईत करण्यामागील कारण काय असावे याचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकरांना ईडी, एनआयए, सीबीआय चौकशी लावण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.