ETV Bharat / state

Refinery Project Issue : धोपेश्वर ग्रामपंचायतीमध्ये रिफायनरी ठरावावर आज मतदान; समर्थक-विरोधकांची मोर्चेबांधणी

author img

By

Published : Apr 6, 2022, 10:10 AM IST

राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आज रिफानरीबाबत ठराव होणार आहे. यावेळी जवळपास 850 लोक सहभागी होणार आहेत. गावात स्थानिक आणि मतदार असलेल्यांना या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे.

धोपेश्वर ग्रामपंचायत
धोपेश्वर ग्रामपंचायत

रत्नागिरी - कोकणातील रिफायनरीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आज रिफानरीबाबत ठराव होणार आहे. यावेळी जवळपास 850 लोक सहभागी होणार आहेत. गावात स्थानिक आणि मतदार असलेल्यांना या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे.

धोपेश्वर ग्रामपंचायतीमध्ये रिफायनरी ठरावावर आज मतदान

ग्रीन रिफायनरी असं नामकरण - जवळपास 5 हजार एकर जमीन या गावची असून कोकणातील नवीन जागेची चाचपणी रिफायनरीसाठी सुरू झाल्यानंतर आता या ग्रामसभेच्या ठरावाकडे लक्ष लागून राहिलं आहे. यापूर्वी नाणार येथील प्रकल्प रद्द झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी असं या रिफानरीचं नामकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता धोपेश्वर रिफायनरी असं नाव या रिफायनरीला देण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच गावात होणारा ग्रामसभेचा ठराव लक्षवेधी आहे. समर्थक आणि विरोधक यांच्याकडून जोरदार मोर्चेंबांधणी आजच्या मतदानासाठी करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.