रत्नागिरी - दिवसेंदिवस रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज (शनिवार) आणखी 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 86 वर पोहोचली आहे.
मिरज येथे पाठवलेल्या तपासणी नमुन्यांपैकी आज 4 अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. हे सर्व चारही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 3 रुग्ण कामथे येथे, तर 1 रुग्ण कळंबणी येथे संस्थात्मक क्वारंटाइन होता. कामथे येथील 3 रुग्ण चिपळूण तालुक्यातील कापरे येथील रहिवासी आहेत. तर कळंबणी येथील रुग्ण हा संगमेश्वर येथील रहिवासी आहे. या चारही जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 86 झाली आहे.