ETV Bharat / state

पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला चावा घेत पळाला संशयित आरोपी - ratnagiri police news marathi

जिल्ह्यातील एका गुन्ह्यात हेमंत देसाई पोलिसांना हवा होता. त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता.

ratnagiri crime
ratnagiri crime
author img

By

Published : Feb 20, 2021, 5:26 PM IST

रत्नागिरी - गुन्ह्यातील संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर संशयिताने हल्ला केला. दोघांच्या हाताचा चावा घेवून हेमंत पाडुरंग देसाई (वय २९, रा. कांदिवली) हा फरार झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११.३०वाजता उद्यमनगर येथे ही घटना घडली. याबाबत शहर पोलीस स्थानकात हेमंत देसाई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितावर विविध गुन्हे दाखल

जिल्ह्यातील एका गुन्ह्यात हेमंत देसाई पोलिसांना हवा होता. त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने गुन्हे केल्याच्या शक्यतेने तो पोलिसांना हवा होता. शुक्रवारी देसाई हा उद्यमनगर येथे आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी प्रवीण खांबे, दत्तात्रेय कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी उद्यमनगर येथे गेले होते. पोलिसांना पाहिल्यानंतर हेमंतने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी हेमंतने दोन्ही कर्मचाऱ्यांच्या हाताला चावा घेवून तेथून पळ काढला.

गुन्हा दाखल

दोन कर्मचाऱ्यांना चावून हेमंत पळून गेल्यानंतर त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह शहर, ग्रामीण पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना चावून पळणाऱ्या हेमंत देसाईविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.