ETV Bharat / state

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; एक ठार सातजण जखमी खेड तालुक्यातील खवटी येथे क्वालिसची उभ्या आयशरला धडक - Accident on Mumbai Goa Highway

मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या क्वालिस कारचा खेड येथे भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक किशोर अनंत चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. खेड तालुक्यातील खवटी रेल्वेब्रीज जवळ हा भीषण अपघात झाला.

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
author img

By

Published : May 17, 2022, 8:15 AM IST

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या क्वालिस कारचा खेड येथे भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक किशोर अनंत चव्हाण (४८ धामापूर संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. खेड तालुक्यातील खवटी रेल्वेब्रीज जवळ हा भीषण अपघात झाला.

जोरदार धडक दिल्याने अपघात - संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या क्वालिस गाडी क्रमांक MH.04. BN.4193 वरील चालक किशोर वसंत चव्हाण यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडीने रस्त्याच्या साईडला उभ्या असणाऱ्या आयशर गाडीला (क्र.MH.08.AP.6996) मागून धडक दिली. या भीषण अपघातामध्ये क्वालीस गाडीचे चालक किशोर चव्हाण यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी तपासून घोषित केले.

अपघातातील जखमींवर उपचार - अपघाताचे वृत्त कळताच कशेडी टॅब येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यामध्ये बोडकर, समेल सुर्वे आदी पोलिसांचा समावेश होता. या अपघातात क्वालीस गाडीमधील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये कुमारी सनम संदीप चव्हाण वय 12 वर्षे ( डोक्याला गंभीर दुखापत), हर्षदा किशोर चव्हाण वय 40 वर्षे( डोक्याला गंभीर दुखापत), संतोष आबाजी चव्हाण वय 55 वर्ष ( डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत), कुमारी रितिका केशव चव्हाण वय16वर्ष( डोक्याला गंभीर दुखापत), कुमार सार्थक किशोर चव्हाण वय 14 वर्ष (उजव्या हाताला किरकोळ दुखापत), सौ स्मिता संतोष चव्हाण वय 50वर्षे( डोक्याला किरकोळ मुकामार), स्नेहा सुरज कर्वे 28 वर्षे (डोक्याला किरकोळ दुखापत) हे जखमी झाले आहेत. या सगळ्या जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचार चालू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.