रत्नागिरी - रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वेच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेमार्गावरुन धावणारी तेजस एक्स्प्रेस आता 16 डब्यांची झाली आहे. नाताळची सुट्टी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यासह कोकणात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
पर्यटकांची गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर जास्तीच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांचे आरक्षण फुल असल्याने तेजस गाडीचा डबा वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तेजस एक्स्प्रेस आता 16 डब्यांची झाली आहे.
क्यार वादळ आणि महा वादळामुळे दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली होती. मात्र नाताळच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे. तेजस एस्क्प्रेस ही नियमित 15 डब्यांची गाडी असते. मात्र, 5 जानेवारीपर्यंत तेजस एक्स्प्रेस ही 16 डब्यांची असणार आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.