ETV Bharat / state

रत्नागिरीत महिला डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे

कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. डॉक्टरचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सकांनी ते पुण्याला तपासणीसाठी पाठवलेच नाहीत, असा आरोप या संशयित महिला डॉक्टरने केला.

कोरोनाची लक्षणे
Symptoms of Corona
author img

By

Published : Mar 20, 2020, 10:51 AM IST

Updated : Mar 20, 2020, 11:55 AM IST

रत्नागिरी - कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. या डॉक्टरचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सकांनी ते पुण्याला तपासणीसाठी पाठवलेच नाहीत, असा आरोप या संशयित महिला डॉक्टरने केला आहे.

हेही वाचा - कोरोना : पिंपरी-चिंचवडमध्ये आदेश न पाळण्याऱ्या १०२ जणांवर गुन्हे दाखल

जिल्हा शल्य चिकित्सक माझ्यासोबतच अनेक जीवांशी खेळत असल्याचा आरोपही या महिला डॉक्टरने केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे महिलेने तक्रार केली आहे. दरम्यान, या डॉक्टरने स्वतःला कॉरेंटाईन करुन घेतले आहे.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय

भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या १९५ वर गेली आहे. यामध्ये ३२ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक अश्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ४४ जणांना तर केरळमध्ये २६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली, कर्नाटक, उत्तरप्रदेश, लडाख, राजस्थान आणि तेलंगाणा राज्यात प्रत्येकी १७, १५, १९, १०, ७, १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. २० नागरिक उपचारानंतर पूर्णतहा: बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Last Updated : Mar 20, 2020, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.