रत्नागिरी - काही लोकांना वाटले होते, की भाजप रसातळाला जाईल, पण तसे होत नाही. सोशल मिडियावर तसे चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतो. मात्र तसे होणार नाही, असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी ( Swami Ramvdev Baba on BJP performance ) व्यक्त केले. योग शिबिरासाठी रत्नागिरी ( Swami Ramdev Ratnagiri visit ) दौऱ्यावर आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.
योगगुरू रामदेव बाबा यांनी ऐतिहासिक पतित पावन मंदिर ( Patit Pavan Mandir ) , वीर सावरकर स्मारक ( Veer Savarkar Smark Ratnagiri ) आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाला ( Lokmany Gangadhar birthplace ) भेट दिली. पत्रकार परिषदेत बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल असे एक्झिट पोलमधून दिसत आहे. भाजपसोबत केजरीवालसुद्धा चांगली कामगिरी करतील. तर काँग्रेसला राज्यस्तरावर नेतृत्वाचा अभाव आहे. राष्ट्रीय स्तरावर आणखी ओजस्वीता मिळाली तर काँग्रेस अधीक बळकट होईल. या निवडणुकीत सर्वांना आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळेल, असे मत योग गुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. बाकी यावर माझ्यासारखा फकीर काय बोलणार, असे सांगायला ते विसरले नाहीत.
हेही वाचा-Assembly Election 2022 : काँग्रेसला साथ देणाऱ्या दिगांबर कामतांची ही आहे सहावी निवडणूक
केंद्रीय यंत्रणाची धाड म्हणजे दोन वजिरांची लढत
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगलं काम करत असल्याची कौतुकाची थाप योग गुरु रामदेव बाबा यांनी दिली. दरम्यान महाराष्ट्रात सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या धाड सत्रावर बोलताना दोन वजीर लढत आहेत, असे विधान केले. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतरत्न असून त्यांना भारतरत्न मिळायला हवे. आज ना उद्या याची घोषणा नक्की होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा-Michael Lobo : कमळला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा पकडला 'हात'; पाहा, मायकल लोबोची कारकीर्
अॅलोपॅथीवर रामदेव यांची टीका
अॅलोपॅथीवर रामदेव यांनी कोरोनाच्या काळात टीका केली होती. त्यावर रामदेव बाबा म्हणाले, की मी केवळ मत मांडत औकात दाखवली होती, असा त्यांनी पुनरुच्चार केला. पाच राज्यांच्या निकालावर अधिक बोलणे रामदेव बाबा यांनी टाळले.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब; सरकारी वकील आणि पोलिसांकडून षडयंत्र सुरू असल्याचा विधानसभेत गंभीर आरोप