ETV Bharat / state

'रामदास कदमांना खोटे बोलण्याचा पुरस्कार द्यायला हवा' - shivsena

२०१९ ची विधानसभा घोषित होण्याआधीच कोकणात शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम व शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यात जोरदार वाद पेटले आहेत.

ratnagiri
author img

By

Published : Feb 4, 2019, 1:40 PM IST

रत्नागिरी - कोकणात आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. २०१९ ची विधानसभा घोषित होण्याआधीच कोकणात शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम व शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यात जोरदार वाद पेटले आहेत.

ratnagiri
undefined

रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघामधून आगामी निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत, मात्र त्यांना तेथील शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांचा विरोध आहे. आतापासून दोघांचे एकमेकाविरूद्ध आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. नुकतेच रामदास कदम यांनी माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यावर आरोप करत म्हणाले 'मी त्यांना निवडणुकीत ५० हजार देत होतो, त्यांना गाडीही मिळवून दिली होती' असा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या टीकेला माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले रामदास कदम हे बिनबुडाचे आरोप करत खोटे बोलत आहेत. त्यांना खोटे बोलण्याचा पुरस्कार द्यायला हवा, अशी टीका दळवी यांनी केली आहे.

ratnagiri
तसेच रामदास कदम यांना प्रथम मीच राजकारणात संधी दिली, असे सांगून या निवडणुकीत आम्ही हे पार्सल पुन्हा कांदिवलीला पाठवणार असल्याची टीका दळवी यांनी केली. तसेच जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी गुहागरमधून लढवावी, असा टोला दळवी यांनी रामदास कदम यांना लगावला.

Intro:रामदास कदम यांना खोटं बोलण्याचा पुरस्कार द्यायला हवा

माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचं रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तर

रत्नागिरी, प्रतिनिधी

निवडणुकीचे पडघम आता कोकणात वाजू लागले आहेत.. त्यातच २०१९ ची विधानसभा घोषित व्हायच्या आधीच कोकणात सध्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पर्यावरण मंत्री रामदास कदम व शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यात विस्तव जात नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
दापोली मतदारसंघामधून आगामी निवडणूक रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम लढण्याची तयारी करत आहे मात्र त्यांना तेथील शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांचा विरोध आहे व यातून आता पासून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. नुकतेच रामदास कदम यांनी माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यावर मि त्यांना निवडणुकीत ५० हजार देत होतो, त्यांना गाडीही मिळवून दिली होती असा गौप्यस्फोट केला होता..त्यांच्या या टीकेला माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी प्रत्युत्तर रामदास कदम हे धादांत खोटं असून खोटं बोलण्याचा त्यांना पुरस्कार द्यायला हवा अशी टीका दळवी यांनी केली आहे. तसेच रामदास कदम यांना प्रथम मीच राजकारणात संधी दिली, असे सांगून या निवडणुकीत आम्ही हे पार्सल पुन्हा कांदिवलीला पाठवणार असल्याची टीका दळवी यांनी केली आहे.. तसेच जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी गुहागर मधून लढवावी असा टोला दळवी यांनी रामदास कदम यांना लगावला आहे..

बाईट - सुर्यकांत दळवी, माजी आमदार- शिवसेनाBody:रामदास कदम यांना खोटं बोलण्याचा पुरस्कार द्यायला हवा माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचं रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तरConclusion:रामदास कदम यांना खोटं बोलण्याचा पुरस्कार द्यायला हवा
माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचं रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.