रत्नागिरी - जिल्ह्यामध्ये रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण पुन्हा तापलेले असतानाच रिफायनरी प्रकल्प होण्याअगोदरच प्रकल्प समर्थकांची अनोखी मागणी पुढे येत आहे. या रिफायनरी प्रकल्पाला 'छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी' नाव देण्याची मागणी प्रकल्प समर्थकांनी केली आहे. तशा आशयाचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांना या प्रकल्पाला समर्थन दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टर्समध्ये असे सांगण्यात आले की, 'छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी' चे राजापूर तालुक्यात हार्दिक स्वागत. मी जमीनमालक पंढरीनाथ आंबेरकर, गाव कुंभवडे, रिफायनरी प्रकल्पाचे स्वागत करतो. असा मजकूर असून या पोस्टर्सवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोसह छापला आहे. तसेच जमीन मालक पंढरीनाथ आंबेरकर यांचाही फोटो या पोस्टरवरआहे.
हेही वाचा - रत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर बेछूट गोळीबार; कारण अस्पष्ट
याबाबत प्रतिक्रिया देताना आंबेरकर म्हणाले, की या रिफायनरी प्रकल्पाला 'छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी' असं नाव देण्यात यावे, अशी मागणी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान तसेच सर्वच तालुक्यातून होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान या पोस्टर्समुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.