रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये डुकरांच्या पिल्लांना स्थानिक गावकऱ्यांनी जीवदान दिल्याचे दिसत आहे.
गावातील घराचे बांधकाम चालू होते. घराच्या शेजारील एका मोठ्या खड्ड्यात मादी डुक्करासह 11 पिल्ले पडली. पिल्लांची आई या खड्ड्यातून बाहेर आली. मात्र, खड्डा मोठा असल्याने पिल्ले खालीच अडकली. सकाळी गावातील मंडळीना ही पिल्ले खड्ड्यात अडकल्याचे लक्षात आले. यानंतर ग्रामस्थांनी पिल्लांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. स्थानीकांनी खड्ड्याचा काही भाग खोदला आणि या पिल्लांची सुटका करण्यात आली.
हा सगळा प्रकार गावकऱ्यांनी मोबाईलमध्ये चित्रीत केल्याने सध्या त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संबंधित घटना लांजा तालुक्यातील गव्हाणे गावात घडल्याची माहिती मिळत आहे.