रत्नागिरी- मुंबई महानगरपालिकेला दोन आयुक्त नकोत, अशी सष्ट भूमिका शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी मांडली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईला दोन आयुक्त असावेत, अशी मागणी केली होती. त्यावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एक आयुक्त हीच संकल्पना योग्य आहे -
मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या सुस्थितीत चालला आहे. नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीने होत असताना मुंबईला दोन आयुक्त देणं हे योग्य होणार नाही. आयुक्त जरी एक असले तरी त्यांच्या हाताखाली अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त असे अनेक अधिकारी काम करत असतात. मुंबईचं आजचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि चाललेलं कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी एक आयुक्त हीच संकल्पना योग्य आहे, असेही राऊत म्हणाले.