ETV Bharat / state

ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये - खा. विनायक राऊत

author img

By

Published : Jul 7, 2021, 3:21 PM IST

Updated : Jul 7, 2021, 3:31 PM IST

ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये, असा थेट इधारा खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना दिला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

t
t

रत्नागिरी - ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये, असा थेट इशारा खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना दिला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

खासदार राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हि आता गरज आहे. खूप पदे रिक्त आहेत. त्यामुळे असलेल्या थोड्या मंत्र्यांवर भार पडत असल्याने ते योग्य प्रकारे कामकाज करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हे क्रमप्राप्त आहे. आता ते करत असताना शिवसेनेचा विचार करून एखाद्याची वर्णी लागत असेल, तर हे शिवसेनेचे मोठेपण आहे. पण ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये. यापूर्वीची शिवसेना त्यांनी अनुभवलेली आहे. आताची शिवसेनाही अनुभवलेली आहे. कोकण म्हणजे शिवसेना हे जे समीकरण आहे ते कायम आहे, ते कोणीही पुसण्याचे काम करू शकत नाही असे राऊत म्हणाले.

पत्रकारांना प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत
ईडीचा एवढा वापर स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता - खासदार राऊत
दरम्यान केंद्रातील भाजप सरकारने या 2 वर्षांत ईडीचा जेवढा दुरूपयोग केला आहे, तेवढा स्वातंत्र्यानंतरच्या कोणत्याही सरकारने केला नव्हता असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. खासदार राऊत म्हणाले की, केवळ आपल्या विरोधकांना ठेचून काढण्यासाठी त्यांना त्रास देण्यासाठी ईडीचं बाहुले समोर काढले जात आहे. ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. यातूनच एकनाथ खडसे यांचे जावई म्हणा किंवा अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना किंवा प्रताप सरनाईक म्हणा यांच्यावरील कारवाई ही केवळ सरकारची ड्रामेबाजी असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. भास्कर जाधव हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहे. संसदीय कामकाजामध्ये त्यांचे असलेलं ज्ञान, अनुभव हे खरोखरच वाखाणण्यासारखे असल्याचे खासदार विनायक राऊत म्हणाले.
बारसू येथे प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाला, तर कोणीही येवो हाकलंल जाईल - राऊत
रिफायनरीच्या नवीन जागेबाबत अद्याप काहीही प्रस्ताव नाही. जर पाचही गावांची सहमती असेल तर शिवसेना त्यांच्याबरोबर असेल, परंतु आजपर्यंत त्या गावांमध्ये विरोधाचे ठराव झाल्याचे मी ऐकलेलं आहे. तसेच कंपनीने सुद्धा पर्यायी जागेची मागणी अद्यापही केलेली नाही. त्यामुळे आज तरी बारसू येथे रिफायनरी नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान कोणावर गोळ्या झाडून, कोणाचे मुडदे पाडून जर तो रिफायनरी प्रकल्प करायचा असेल आणि त्यामध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समाधान वाटत असेल तर त्यांनी नारायण राणे यांना मंत्री करावं, पण ज्याप्रमाणे नाणारची रिफायनरी हटविली त्याप्रमाणे जर बारसूच्या लोकांना जर हा प्रकल्प नको असेल आणि त्यांच्यावर जर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाला तर कोणत्याही परिस्थितीत कोणीही येवो तेथून त्यांना हाकलंल जाईल, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिला.

Last Updated : Jul 7, 2021, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.