ETV Bharat / state

रत्नागिरीत शिवभोजन आपल्या दारी,  झोपडपट्टीतील गरिबांपर्यंत पोहचवले जाते शिवभोजन - रत्नागिरीत शिवभोजन आपल्या दारी झोपडपट्टीतल्या गरिबांपर्यंत पोहचवलं जात आहे शिवभोजन

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांसाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनव योजना आखली. रत्नागिरीत आता शिवभोजन आपल्या दारी अशी संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे शिवभोजनच्या थाळी थेट गरिबांपर्यत पोहचवल्या जात आहेत.

shivabhojan-thali
गरिबांपर्यंत पोहचवलं जात आहे शिवभोजन
author img

By

Published : Mar 31, 2020, 8:11 PM IST

रत्नागिरी - कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. पण या लॉकडाऊनमुळे गरीब भरडला जात आहे. पण याच गरिबांसाठी सरकारची शिवभोजन थाळी त्यांच्या घरापर्यंत पोहचली आहे..

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या खाण्याचे हाल होत आहेत. दरम्यान अशा गरिबांसाठी त्यांच्या घरापर्यंत भोजन पोहचावे यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनव योजना आखली. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीत आता 'शिवभोजन आपल्या दारी' अशी संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे शिवभोजनच्या थाळी थेट गरिबांपर्यत पोहचवल्या जात आहेत.

गरिबांपर्यंत पोहचवलं जात आहे शिवभोजन

आज रत्नागिरी आठवडा बाजाराजवळ असलेल्या झोपडपट्टीत गरिबांना ही थाळी देण्यात आली. शिवभोजनचा ठेका असलेल्या हॉटेल मंगलाच्या माध्यमातून जवळपास १२० शिवभोजन थाळी या झोपडपट्टीत जाऊन वाटण्यात आल्या. याचाच आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर याने...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.